Headlines

कॅनडामध्ये पंजाबमधील विद्यार्थिनीची गळा आवळून हत्या:लिव्ह-इन पार्टनरला अटक; 5 वर्षांपूर्वी कॅनडाला गेली होती




कॅनडातील एडमंटन शहरात पंजाबमधील २३ वर्षीय विद्यार्थिनी दमनप्रीत कौरची गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तिच्या २२ वर्षीय भारतीय लिव्ह-इन पार्टनर रितिश कुमारला अटक केली आहे. दमनप्रीत पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील समराला येथील रहिवासी होती. ती विद्यार्थी व्हिसावर सुमारे ५ वर्षांपूर्वी कॅनडाला गेली होती. एडमंटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी ती एका घरात गंभीर अवस्थेत आढळली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान १२ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. १४ जुलै रोजी झालेल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण गळा आवळणे असे नमूद करण्यात आले. पोलिसांनी २२ जुलै रोजी रितिश कुमारला अटक करून त्याच्यावर सेकंड डिग्री खुनाचा आरोप लावला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे लिव्ह-इन पार्टनरशी संबंधित खुनाचे प्रकरण आहे आणि सध्या इतर कोणत्याही आरोपीचा शोध घेतला जात नाहीये. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दमनप्रीतच्या शिक्षणासाठी तिच्या पालकांनी कर्ज घेऊन तिला कॅनडाला पाठवले होते. आता तिचा मृतदेह भारतात आणण्यासाठी ऑनलाइन निधी गोळा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे वकील करीम खान यांना पदावरून हटवले, लैंगिक छळाचा आरोप आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे (ICC) वकील करीम खान यांना लैंगिक छळाच्या आरोपांखाली पदावरून हटवण्यात आले आहे. ICC च्या सदस्य देशांच्या सभेने शुक्रवारी यावर मतदान करून त्यांना हटवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, करीम खान यांच्या कायदेशीर पथकाने या निर्णयाला राजकीय म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, स्वतंत्र चौकशी समितीला त्यांच्याविरुद्ध गैरवर्तनाचे ठोस पुरावे मिळाले नाहीत. तसेच, त्यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधीही दिली नाही. करीम खान 2024 मध्ये इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि तत्कालीन संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर चर्चेत आले होते. यानंतर अमेरिकेने करीम खान यांच्यासह ICC च्या अनेक अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले होते. या वर्षी जूनमध्ये एका देखरेख पॅनेलने खानवर गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी काही काळासाठी आपले पद सोडले होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत