Headlines

कुकरचा रबर गॅस्केट साधारणपणे किती दिवसाने बदलावा?,काळजी घ्या नाहीतर होईल स्फोट – when to change pressure cooker rubber gasket cooking tips


pressure cooker Tips : प्रेशर कुकरचा रबर गॅस्केट हा सुरक्षित वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.वेळेवर गॅस्केट बदलल्यास कुकरची कार्यक्षमता टिकून राहते आणि धोका टाळता येतो.म्हणून गॅस्केटची नियमित तपासणी करा आणि खराब झाल्यास त्वरित नवीन रिंग बसवा.

Pressure cooker rubber gasket replacement
फोटो सौजन्य :- @iStock
स्वयंपाकघरातील प्रेशर कुकर हा प्रत्येक घरातील महत्त्वाचा भाग आहे. डाळ, भात, भाज्या, मांस किंवा इतर पदार्थ पटकन शिजवण्यासाठी कुकरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, कुकर वापरताना त्याची योग्य देखभाल करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः कुकरमधील रबर गॅस्केट कुकरची रिंग वेळेवर बदलली नाही तर कुकर व्यवस्थित काम करत नाही आणि काही वेळा धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.अनेक जण कुकरचा रबर गॅस्केट खराब होईपर्यंत तो बदलत नाहीत. पण गॅस्केट ही कुकरच्या सुरक्षिततेतील महत्त्वाची गोष्ट आहे.

प्रेशर कुकरमध्ये शिजवताना झाकण आणि कुकरच्या भांड्यामध्ये योग्य प्रकारे सील तयार होणे गरजेचे असते. हे काम रबर गॅस्केट करते. कुकरमध्ये तयार होणारी वाफ आतमध्ये अडकवून योग्य दाब निर्माण करण्यासाठी गॅस्केटची भूमिका महत्त्वाची असते. जर गॅस्केट जुने झाले, सैल झाले किंवा खराब झाले तर वाफ बाहेर जाऊ शकते आणि पदार्थ शिजण्यास जास्त वेळ लागू शकतो.अनेकदा घरातील लोक कुकरची शिट्टी व्यवस्थित वाजत आहे की नाही याकडे लक्ष देतात, पण रबर गॅस्केटची स्थिती तपासण्याकडे दुर्लक्ष करतात.

ही सवय बदलणे गरजेचे आहे. कारण कुकरचा गॅस्केट हा सतत उष्णता, वाफ आणि दाबाच्या संपर्कात असतो. त्यामुळे काही काळानंतर त्याची गुणवत्ता कमी होणे स्वाभाविक आहे.विशेषतः ज्या घरांमध्ये रोज दोन-तीन वेळा कुकर वापरला जातो, तिथे गॅस्केटवर जास्त ताण येतो. सतत गरम होणे आणि थंड होणे यामुळे रबरची लवचिकता कमी होऊ शकते. त्यामुळे गॅस्केट वेळोवेळी तपासणे आणि गरजेनुसार बदलणे ही सुरक्षिततेची महत्त्वाची पायरी आहे. (फोटो सौजन्य :- @iStock)

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा