Vaibhav Sooryavanshi First Match Score : वैभव सूर्यवंशीचे अखेर टीम इंडियामध्ये पदार्पण झाले आहे. काल झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वैभवला संधी मिळाली. त्यानंतर मैदानावर त्याची लहान पण आक्रमक खेळी पाहायला मिळाली. वैभव हा भारताचा पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे, तरीही सचिनबाबत त्याचा आणखी एक योगायोग जुळून आला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अवघ्या १४ धावा. स्कोअरकार्डवर पाहिलं तर हा आकडा फारसा मोठा वाटत नाही. पण क्रिकेटमध्ये प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात अशाच एखाद्या छोट्या पावलाने होत असते. त्यामुळेच भारताच्या १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर एक गोष्ट पुन्हा चर्चेत आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वैभवला भारताकडून पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली. मोठ्या अपेक्षांसह मैदानात उतरलेल्या या युवा फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्याने १० चेंडूंमध्ये १४ धावा केल्या. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद १९० धावा उभारल्या होत्या. मात्र, इंग्लंडच्या जेकब बेथेलने नाबाद ७६ धावांची दमदार खेळी करत इंग्लंडला चार विकेट्स राखून विजय मिळवून दिला. त्यामुळे वैभवच्या पदार्पणावर भारताच्या पराभवाची छाया पडली.
मास्टर ब्लास्टरच्या पहिल्या मॅचमध्ये काय घडलेलं?
मात्र, त्या एका डावावरून त्याच्या भवितव्याचा अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही. याच कारणामुळे अनेकांना भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची आठवण झाली. सचिननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या डावात २४ चेंडूंमध्ये १५ धावा केल्या होत्या. हा कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध १५ नोव्हेंबर १८८९ रोजी कराचीत खेळवला गेला होता. त्या वेळी कुणालाच कल्पना नव्हती की, पुढे हाच मुलगा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान फलंदाजांपैकी एक ठरेल.
१४ धावा आणि १५ धावा आकडे जवळपास सारखेच. पण खेळाडूची खरी ओळख पहिल्या डावावरून नव्हे, तर पुढील अनेक वर्षांच्या मेहनतीवर, सातत्यावर आणि जिद्दीवर ठरत असते. क्रिकेटचा इतिहासही हेच सांगतो.
पुढील खेळावर सर्वांच्या नजरा
वैभव सूर्यवंशीबाबतही अनेक दिग्गजांनी यापूर्वी मोठा विश्वास व्यक्त केला आहे. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यातील १४ धावांपेक्षा त्याचा पुढील प्रवास कसा घडतो, याकडेच आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीचीही ही केवळ सुरुवात आहे. पहिल्या डावातील धावा अनेकदा विसरल्या जातात, पण त्यानंतर घडवलेला इतिहास कायम लक्षात राहतो.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा