Avadhoot Gupte on Sunidhi Chauhan kande pohe song:२००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सनई चौघडे’ हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातली गाणी देखील प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेचा विषय ठरली. या सिनेमातलं कांदे पोहे हे गाणं तर आजही व्हायरल गाण्यांपैकी एक आहे.

लग्नाचं वय झालेली एक तरुणी, लग्नासाठी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमातील मुलीची मनस्थिती भावनिकरीत्या मांडणाऱ्या या गाण्यानं लाखो प्रेक्षकांच्या मनाचा, तरुण मुलींच्या मनाटा ठाव घेतला. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांनी स्वतः या हे गाणं लिहिलं लिहिलं असून संगीतबद्धही केलं आहे. बॉलिवूडची लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान हिच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं होतं. आजही कॉन्सर्टमध्ये ती हे गाणं गाते. पण तुम्हाला माहिती आहे की, या गाण्यासाठी सुनिधी ही पहिली पसंत नव्हती. याचा किस्सा स्वत: अवधूत गुप्तेंनी शेअर केलाय.
‘सनई चौघडे’ हे नाव नव्हतं
खरं तर’सनई चौघडे’ असं सिनेमाचं नाव नव्हतंच. आधी सिनेमाचं नाव हे ‘कांदे पोहे’ असं होतं, असा खुलासा करत अवधूत गुप्तेंनी ‘कांदे पोहे’ या गाण्यामागची गोष्टही उलगडली. तर स सुनिधी चौहानच्या आवाजातलं हे गाणं आजही तरुणाईचं आवडतं गाणं, पण सगळ्यात आधी हे गाणं एका मराठी अभिनेत्रीनं गायलं होतं.
Asim Riaz On Himanshi Khurana : पुरावे सार्वजनिक करु का? ब्रेकअपनंतरही मेसेज, असीम रियाझचा रात्री उशिरा Ex हिमांशी खुरानाच्या आरोपांवर पलटवार
तर सिनेमाचं दिग्दर्शक राजीव पाटील यांनी अवधूत गुप्तेंना सिनेमाची कथा मोडक्या ओळींमध्ये सांगितली. अगदी एका ओळीत त्यांना सिनेमाची कथा ऐकवण्यात आली होती. लग्न जमवताना जेव्हा अरेंज मॅरेजच्या प्रक्रियेत मुलींना कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं, त्यांची भावना नेमकी काय असते… हे ऐकल्यानंतर अवधूत यांनी ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे’ लिहिलं होतं.
गाणं लिहून झाल्यानंतर आता गाणं गायला कोणाला द्यायचं याबद्दल चर्चा सुरू झाली. गाण्याच्या रेकॉर्डिंगचा ट्रॅक तयार झाला. मी अमृता सुभाष यांचा मी चाहता होतो, त्यामुळं मी त्यांना विचारलं. त्यांच्या आवाजात एक प्रामाणिकपणा, एक वेगळी भावुकताआहे. त्यांच्याकडून हे गाणं रेकॉर्ड करून घेतलं होतं. मग झालं असं की, सिनेमाच्या टीमची तसंच एका वेगळ्या संगीताची गरज लक्षात घेता, या गाण्याला एक वेगळा आवाज किंवा व्हॉइस टेक्चरची गरज असल्याचं सगळ्यांना वाटलं. मग त्यानंतर सुनिधी चौहानला संपर्क साधण्यात आला होता, असं गुप्ते यांनी सांगितलं.
Hania Aamir : दारू की अमली पदार्थांचा ओव्हरडोस? नशेत धुंद दिसली पाकिस्तानी अभिनेत्री, व्हिडिओ प्रचंड व्हायरल
अमृता सुभाष यांच्या गायनाबद्दल मनात प्रचंड आदर आहे, पण त्यावेळी चित्रपटाच्या व्यावसायिक व तांत्रिक गणितांमुळं अखेर सुनिधी चौहान यांच्या आवाजातील व्हर्जन चित्रपटात ठेवण्यात आल्याचंही गुप्ते यांनी सांगितलं.
‘माझी इच्छा नव्हती’
खरं तर सुनिधीकडून कांदे पोहे हे गाणं गाऊन घ्यायची त्यावेळी माझी इच्छा नव्हती, असंही अवधूत यांनी यावेळी म्हटलं. मी सुनिधी चौहान आणि सोनू निगम यांचा वेड्यासारखा चाहता आहेच, पण मी त्यांचा भक्तही आहे. पण, मी जेव्हा दुसऱ्या भाषेत गाणी गायली. तेव्हा मला कळलं की, जेव्हा आपण दुसऱ्या भाषेतील गायक आणतो तेव्हा त्यांची मेहनत ही भाषेवर काम करण्यासाठी जाते. या गाण्यानंतर सुनिधीकडून प्रोफेशनॅलिझम शिकायला मिळालं, अशी ही खास आठवण अवधूत यांनी सांगितली.
Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद
पुण्याच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये वाजलं ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे’
गायिका सुनिधी चौहान हिच्या लाईव्ह कॉन्सर्टनं देशभरात धुमाकूळ घातला आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना खास सरप्राइज मिळालं. हे सरप्राइज होतं ते म्हणजे तो म्हणजे तिनं गायलेलं गाजलेले मराठी गाणे ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे’. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

