Headlines

एसपी कदम यांच्या हस्ते होमगार्ड कॅम्पसमध्ये रस्त्याचे काम सुरू:कॅम्पसच्या विकासाला गती, जवानांसाठी सुविधा वाढवण्यावर भर




अमरावती येथील काँग्रेस नगर रोडवरील होमगार्डच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील विकासकामांना गती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक (एसपी) निकेतन कदम यांच्या हस्ते अंतर्गत रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ उत्साहात पार पडला. यावेळी परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. होमगार्ड जवानांना प्रशिक्षणादरम्यान सुरक्षित, सुसज्ज आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात, हा या कामामागील मुख्य उद्देश आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर कॅम्पसमधील दळणवळण अधिक सुलभ होईल आणि प्रशिक्षणासाठी येणाऱ्या जवानांना त्याचा मोठा फायदा होईल. एसपी निकेतन कदम हे होमगार्ड जवानांच्या सुविधा आणि त्यांच्या प्रशिक्षणाच्या दर्जाकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विभागातील विविध विकासकामांना चालना मिळत आहे. याशिवाय, अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा होमगार्ड दलाच्या विकासाला नियोजनबद्ध दिशा मिळत आहे. या संपूर्ण विकास प्रक्रियेत केंद्र नायक राम पिंजरकर यांची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या दैनंदिन व्यवस्थेपासून ते परिसरातील विकासकामांपर्यंत त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. गरजा समजून घेणे, वरिष्ठांचे लक्ष वेधणे, समन्वय साधणे आणि कामाच्या प्रगतीचा पाठपुरावा करणे, या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. होमगार्ड दल पोलीस प्रशासनाला विविध बंदोबस्त, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सेवांमध्ये मोलाची साथ देते. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षण केंद्राचा विकास हा जवानांच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी दीपक यवतकर, सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट ठाकरे, कंत्राटदार अंकुश मशीनकर, समादेशक अधिकारी राठोड, करवाडे, अजय आसोले, तायडे, मनीष जोगी, भुसारी, वैशाली शेलारे, मंडले, बडगे, सिंहाले यांच्यासह भूषण पोटे, कपील धवने, सुधाकर रामटेके आणि चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत