Headlines

उदगीरमध्ये 2,143 कोटींच्या परदेशी निधी प्रकरणी मोठी कारवाई:कथित बनावट प्रमाणपत्राद्वारे निधी पाठवल्याचा आरोप, 17 जणांविरुद्ध गुन्हा




परदेशी निधी पाठविण्याच्या व्यवहाराचे कथित खोटे प्रमाणपत्र देऊन तब्बल ₹2,143 कोटी 79 लाख 43 हजार 760 रुपयांचा निधी चुकीच्या पद्धतीने परदेशात पाठविण्यास सहाय्य केल्याप्रकरणी शुक्रवारी उदगीर शहर पोलिस ठाण्यात 17 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके प्रकरण काय 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026 या कालावधीत न्यू मोंढा रोड, उदगीर येथे आरोपींनी संगनमत करून परदेशी निधी पाठविण्याच्या व्यवहारासंदर्भात खोटे प्रमाणपत्र दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रमाणपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणातील निधी परदेशात पाठविण्यास चुकीच्या पद्धतीने सहाय्य केल्याचा आरोप आहे.या प्रकरणात ₹2,143,79,43,760 इतकी रक्कम नमूद करण्यात आली असून, सध्या कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक, लातूर यांच्या आदेशाने पुढील तपास श्रीमती भागीरथी पवार, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, लातूर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संबंधित कंपन्या, प्रमाणपत्रे आणि आरोपींच्या भूमिकेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी दीपक कुमार, उपआयकर संचालक, युनिट-1, औरंगाबाद यांच्या फिर्यादीवरून श्याम शिवप्रसाद कलानी (रा. न्यू मोंढा रोड, उदगीर) यांच्यासह एकूण 16 कंपन्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 234, 229 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या रकमेच्या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे या प्रकरणाकडे उदगीर परिसरात विशेष लक्ष लागले आहे. तपासाअंती या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे नेमके स्वरूप आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे हेही वाचा… नातवाच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकताच आजीनेही सोडला प्राण:काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचे निधन
काही महिन्यांपूर्वी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.हे दुःख ताजे असतानाच नातवाचाही अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजताच आजीनेही क्षणात प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत