Headlines

इडली पात्रात बनवा कुरकुरीत साबुदाणे वडे,तेल कमी चव दुप्पट तन्वी पाटील यांनी शेअर केली भन्नाट रेसिपी – how to make sabudana wada in idli maker


उपवासासाठी साबुदाणा वडा हा अनेकांचा आवडता पदार्थ असला, तरी तो पारंपरिक पद्धतीने भरपूर तेलात तळला जातो. मात्र इडली पात्रात बनवल्यास कमी तेलातही हे वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. ही सोपी, आरोग्यदायी आणि चविष्ट रेसिपी उपवासाच्या दिवशी नक्की करून पाहण्यासारखी आहे.

Sabudana Wada Recipe
Sabudana Wada Recipe
उपवास म्हटला की साबुदाण्याचे पदार्थ हमखास आठवतात. साबुदाण्याची खिचडी, थालीपीठ, वडा किंवा खीर हे अनेक घरांमध्ये आवडीने बनवले जातात. त्यापैकी साबुदाणा वडा हा सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीने साबुदाणा वडा भरपूर तेलात तळला जातो. त्यामुळे तो खायला चविष्ट लागला तरी अनेक जण अतिरिक्त तेलामुळे तो खाणे टाळतात. पण जर हाच वडा अगदी कमी तेलात, कुरकुरीत आणि चवदार बनवता आला तर? इडली पात्राचा वापर करून तुम्ही सहज कुरकुरीत साबुदाणे वडे तयार करू शकता. ही पद्धत केवळ आरोग्यदायीच नाही तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. शिवाय उपवासाच्या दिवशी कमी वेळात आणि कमी तेलात पौष्टिक नाश्ता तयार होतो. (फोटो सौजन्य :- @tanvi_rasoi)
मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा