आयुष्यभर राणेंचा तिरस्कार करणारा आउट झाला, घरच्याच माणसांनी विकेट काढली, असे म्हणत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी माजी खासदार विनायक राऊत यांना खोचक टोला लगावलाय. सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात बोलताना निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तसेच विनायक राऊतांना लाज वाटली पाहिजे, असंही निलेश राणे म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलत असतानाही राणेंनी पुन्हा राऊतांवर आगपाखड केली. घरच्यांनीच त्यांचा कार्यक्रम केला असून आता यापुढेही अनेक लोक त्यांच्यावर उलटणार आहेत असा इशाराही राणेंनी दिला.