Headlines

अजित दादांची थीम असणारी वावडी उडत असताना तरुणही हवेत उडायला लागला, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची थीम असणारी 25 फुटांची वावडी उडवत असताना अनपेक्षित प्रकार बघायला मिळाला. अचानक वारा आल्याने वावडी हवेत जात होती. पण यावेळी दोरीला पकडून असलेला तरुणही हवेत उडू लागला. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Solapur News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : सोशल मीडियावर सध्या एक तरुण एका भल्या मोठ्या पतंगला उडवत असताना त्याच्या दोरीसोबत उडताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तसेच हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. या प्रश्नांचं उत्तर समोर आलं आहे. संबंधित व्हिडीओ हा सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातला आहे. इथे वावडी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याच महोत्सवात एक वावडी उडवत असताना हा प्रकार घडला. या व्हिडीओत जे मोठं पतंग दिसत आहे त्याला वावडी असं म्हणतात.

माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे दरवर्षी वावडी महोत्सव भरवण्यात येत असतो. गावातील मंडळ अशा वावड्या तयार करतात आणि गावाबाहेर असलेल्या माळावर त्यांच्यात स्पर्धा होते. पाच फुटापासून ते 30 फुटापर्यंतच्या वावड्या या स्पर्धेत बघायला मिळतात. या वावडीला हवेत उडवायला 20 ते 25 माणसं असतात. याही वर्षी वावडी महोत्सव नागपंचमीला साजरी झाला. या महोत्सवाला वावड्या उडवण्याची स्पर्धा झाली. पण यंदाच्या वावडी महोत्सवात वीस फुटाच्या वावडी बरोबर वावडी उडवणारा एक युवक जवळपास 25 ते 30 फूट उंच त्या वावडीबरोबरच हवेत गेला. त्यामुळे हा वावड महोत्सव चांगलाच चर्चेत आला.

अजित दादांचा फोटो असलेल्या वावडची चर्चा

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात निमगाव येथे दरवर्षी वावडी महोत्सव होत असतो. या वावडी महोत्सवामध्ये पाच फुटापासून ते 30 फुटापर्यंत वावड्या उडवल्या जातात. यंदा गावातील महाराज प्रतिष्ठानकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या थीमची वावड केली होती. त्या वावडीवर दादा तुम्ही दूर गेलात, पण मनातून कधीच नाही… We Miss You Dada.. लोकनेते अजित दादा अमर रहे असं लिहिलं होतं.

Maharashtra TimesDevendra Fadnavis : महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा, मराठी नाही आली तरी वर्षभर कारवाई होणार नाही

वावड उडवत असताना अचानक वारा आला अन्…

कार्यकर्ते ही वावड घेऊन माळरानावर गेले. दोरी लावून वावड उडवली जात असतानाच अचानक मोठा वारा आला. यामुळे दोरी पकडलेला एक कार्यकर्ता थेट हवेत उडाला. हा कार्यकर्ता 25 ते 30 फूट उंच हवेत राहिला. वावडी हवेत उडत असताना वारा कमी झाल्याने आणि काही कार्यकर्त्यांनी दोरी मोकळी सोडल्याने वावडी थोडी खाली आल्यावर तरुणाने उडी मारली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.