दीपक पडकर, बारामती : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला सहा महिने पूर्ण होऊनही तपासाचा अंतिम निष्कर्ष समोर न आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तपास यंत्रणांनी विलंब न करता अहवाल प्रसिद्ध करून अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं, हे जनतेसमोर मांडावं, अशी मागणी त्यांनी केली.
अजित पवार यांच्या अपघाती निधनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने युगेंद्र पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरातील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना युगेंद्र पवार यांनी अपघात प्रकरणाच्या तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“दादांना जाऊन सहा महिने झाले, मात्र चौकशीतून अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेलं नाही. अनेकजण या विषयावर बोलतात; पण प्रत्यक्षात काहीही पुढे सरकत नसल्याचं दिसतं. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असे युगेंद्र पवार म्हणाले. अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने अपेक्षित उपाययोजनाही पूर्ण झालेल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला.
“साधे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे कामही पूर्ण झालेलं नाही. सीआयडी आणि डीजीसीएकडून तपास सुरू असल्याचं सांगितलं जातं; परंतु अद्याप अंतिम अहवाल समोर आलेला नाही,” असे त्यांनी नमूद केले. पुढे त्यांनी सांगितले, “कारवाई होत नाही, चौकशीचा निष्कर्षही जाहीर होत नाही. आम्ही सहा महिने संयमाने वाट पाहिली. आता मात्र त्या दिवशी नेमके काय घडले, याचे स्पष्ट उत्तर मिळणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी दुसरा अहवाल तातडीने प्रसिद्ध करावा,” अशी मागणीही युगेंद्र यांनी केली आहे.
सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील आपल्या भावाच्या आठवणीत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या निधनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “दादा, तुझ्यासोबतच्या आठवणी मनात कायम जिवंत आहेत. We miss you, Dada,” असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा