Headlines

Your Wife Will Run Away Punes Witty Garbage Board Goes Viral | ‘नवरा दरिद्री होईल, पोरं गंगेवर भीक मागतील!’ रस्ते स्वच्छ करण्यासाठी पुणेकरांनी लावली अशी पाटी, हसून हसून वेडे व्हाल


Pune Viral Photo: रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या बेशिस्त नागरिकांना रोखण्यासाठी पुणेकरांनी एक हटके पद्धत शोधून काढली आहे. त्यांनी रस्त्यावर अशी एक पुणेरी पाटी लावली आहे, जी वाचून कोणीही आयुष्यात पुन्हा रस्त्यावर कचरा फेकण्याची हिंमत करणार नाही.

Pune Viral Board
(फोटो सौजन्य – puneriguide_ आणि punesthal/Instagram)
स्वच्छतेचं महत्त्व काय, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. शाळेत असल्यापासून आपण ऐकतोय, स्वच्छता ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. शिवाय, स्वच्छतेमुळे आयुष्य निरोगी राहतं. पण हे माहीत असताना देखील काही लोकांमध्ये इतकी बेशिस्ती असते की ते वाट्टेल तिथे कचरा फेकतात. अगदी इथे कचरा टाकू नका, अशी पाटी लिहिलेल्या जागेवरही बिनधास्त कचरा फेकतात. पण अशा लोकांना रोखण्यासाठी पुणेकरांनी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. त्यांनी अशी पाटी लावलीये की जी वाचून कचरा रस्त्यावर फेकणारे वाटीभर पाण्यात उडी मारतील. होय, विश्वास बसत नसेल तर मग ही व्हायरल होत असलेली पुणेरी पाटी वाचाच.

काय लिहिलेय पाटीवर?

काय लिहिलेय पाटीवर?

हा फोटो puneriguide_ आणि punesthal या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या पाटीवर अगदी साधा पण अत्यंत प्रभावी मजकूर लिहिलाय. “या परिसरात कचरा टाकणारा डुक्कर आहे. या परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यक्तीची बायको पळून जाईल. नवरा दरिद्री होईल. पोरं गंगेवर भीक मागतील.” हा मजकूर वाचून बेशिस्त लोकं इतकी खजील होतील की स्वप्नातही या ठिकाणी कचरा फेकणार नाहीत.

नेटकरी काय म्हणताहेत?

​ ​

हा फोटो हजारो नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही पाटी पिंपरी-चिंचवड परिसरातील आळंदी रोडवर लावण्यात आली आहे. ही पाटी वाचून कोणीच कचरा टाकण्याची हिंमत करणार नाही. कारण जनाची नसली तरी मनाची लाज प्रत्येकालाच असते, असं मत बहुतांशी लोकांनी व्यक्त केलंय. असो, पण ही पाटीची कल्पना तुम्हाला कशी वाटली? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा