Headlines

Woman Regrets Quitting Corporate Job Shares Financial Struggles After 164 Days | ‘कॉर्पोरेट नोकरी सोडून मोठी चूक केली’, १६४ दिवसानंतरही घर चालवण्यासाठी मिळत नाहीये पैसे, हताश झालेल्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल


Corporate Life: कॉर्पोरेट नोकरी सोडल्यानंतर आर्थिक स्थैर्य मिळवणं किती कठीण असू शकतं, हा अनुभव सांगणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावनेच्या भरात नोकरी न सोडण्याचा सल्ला देत आहेत.

Corporate Job
(फोटो सौजन्य – ruyi.offscript/Instagram)
कॉर्पोरेट वर्क कल्चर खूपच टॉक्सिक असल्याचं अनेकदा म्हटलं जातं. या परिस्थितीसाठी जुनी पिढी कारणीभूत असल्याची टीकाही केली जाते. अर्थात, जुन्या पिढीतील लोकांनी वर्षानुवर्षे खाली मान घालून काम केलं, हे वास्तव आहे. पण आणखी एक वास्तव म्हणजे बेरोजगारी. तुम्ही नोकरी सोडली, तर बाहेर खरंच मुबलक प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत का? आणि त्या नोकरीतून तुमचा घरखर्च भागू शकतो का? असेही प्रश्न निर्माण होतात. याच प्रश्नांची उत्तरं शोधणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. तिने कॉर्पोरेट नोकरी सोडली, पण तिची आर्थिक परिस्थिती फारच बिकट झाली. कॉर्पोरेट जगातून बाहेर पडणं ही मोठी चूक ठरल्याचा अनुभव सांगणारा तिचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

काय म्हणाली महिला?

​ ​

अमेरिकेतील कंटेंट क्रिएटर रुई हिने ९ ते ५ ची कॉर्पोरेट नोकरी सोडल्यानंतर १६४ दिवसांनी तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिने ruyi.offscript या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. नोकरी सोडल्यानंतर तिने डॉग वॉकिंग, योग शिक्षिका, साउंड हीलर, कंटेंट क्रिएटर आणि Airbnb या क्षेत्रांमध्ये काम करून पाहिलं. मात्र, तिला कुठेही अपेक्षित यश मिळालं नाही. उलट, बँकेतील बचत संपली आणि तिची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यामुळे कॉर्पोरेट नोकरी सोडणं ही चूक ठरल्याचा अनुभव तिने व्यक्त केला आहे.

नेटकरी देत आहेत संयम ठेवण्याचा सल्ला

​ ​

हा व्हिडीओ १२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत तिला संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. “प्रयत्न सुरू ठेव, एक दिवस नक्की यश मिळेल,” असा आशावादही अनेकांनी व्यक्त केला आहे.

मात्र, काही नेटकऱ्यांनी या प्रकरणावर विचार करायला लावणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भविष्यातील आर्थिक नियोजन केल्याशिवाय नोकरी सोडू नका. तसेच, पुढे सुरू करायच्या व्यवसायाचा सखोल अभ्यास करा. योग्य नियोजन करा आणि अपयश आल्यास त्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार ठेवा. त्यामुळे आर्थिक ताण आणि निराशा दोन्ही टाळता येतात. असो, या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा