Headlines

Why Food Never Falls Short at American Parties Indian Woman Explains Video Viral | ‘भारतीय लोकं फक्त जेवायला जातात’, अमेरिकेत पार्टी कशी केली जाते? अमेरिकेतील भारतीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल


Why Americans Never Fight Over Food at Parties: अमेरिकेतील समारंभांमध्ये पाहुणे आवश्यक तेवढंच जेवण घेतात. त्यामुळे जेवणासाठी भांडणं होत नाहीत. तसेच, लोक जेवणासाठी नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या आनंदात सहभागी होण्यासाठी येतात, असा अनुभव अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय महिलेनं शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

American Food Culture
(फोटो सौजन्य – samiksha_in__america/Instagram,Team Picsfast/pexels.com)
तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये लोक अन्नपदार्थांसाठी हाणामाऱ्या करताना दिसतात. हे प्रकार प्रामुख्यानं मोठमोठ्या आलिशान लग्नांमध्ये किंवा पार्ट्यांमध्ये घडताना दिसतात. पाहुणे अगदी पनीरचा तुकडा किंवा चिकनच्या एका तुकड्यासाठी एकमेकांवर हातात मिळेल ती वस्तू फेकून मारतात. पण असे प्रकार अमेरिका किंवा युरोपमध्ये का घडत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर एका भारतीय महिलेनं दिलं आहे. तिनं अमेरिकेतील एका समारंभातील जेवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रमाणापेक्षा जास्त लोक समारंभाला उपस्थित राहूनही सर्वांना जेवण कसं पुरतं? चला पाहूया हा व्हायरल व्हिडीओ.

काय म्हणाली महिला?

काय म्हणाली महिला?

हा व्हिडीओ samiksha_in__america या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ‘अतिथी देवो भव’ ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. मात्र, काही कार्यक्रमांमध्ये जेवणावरून गोंधळ किंवा हाणामाऱ्या झाल्याच्या घटना समोर येतात. याउलट, अमेरिकेत असे प्रकार सहसा घडत नाहीत. कारण तेथील लोक जेवण घेताना आवश्यक तेवढेच पदार्थ ताटात वाढून घेतात. अगदी अमर्याद जेवणाची व्यवस्था असली, तरीही बहुतांश लोक प्रत्येक पदार्थ एक किंवा जास्तीत जास्त दोन वेळाच घेतात. त्यामुळे प्रत्येकाला सर्व पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळते.
(फोटो सौजन्य – Jep Gambardella/pexels.com)

जेवण उरलं तर पुन्हा घेतात

​ ​

या भारतीय महिलेच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन लोक कार्यक्रमात केवळ जेवणासाठी येत नाहीत, तर यजमानांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी येतात. तसेच, एखाद्या आमंत्रित व्यक्तीसोबत अतिरिक्त पाहुणा येणार असेल, तर त्याची माहिती आधीच फोन करून दिली जाते. त्यामुळे यजमानांना योग्य नियोजन करता येतं. सर्वांनी जेवण झाल्यानंतर अन्न उरलं, तर लोक पुन्हा आवश्यक तेवढे पदार्थ घेतात.

हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत, अशी अन्नाबाबतची शिस्त भारतातही रुजावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा