Headlines

Why Finding a Flat in Mumbai Feels Tougher Than Cracking UPSC Video Viral | ‘चार वीटा आणि एक पत्रा लावला की खोली तयार’, मुंबईतील घरांची तरुणानं घेतली फिरकी; ५५ लाख वेळा पाहिला गेलाय हा व्हिडीओ


Mumbai housing crisis: मुंबईत भाड्याने घर शोधणं आज अनेकांसाठी मोठं आव्हान बनलं आहे. वाढतं घरभाडं, मर्यादित बजेट आणि घरमालकांच्या विविध अटी यामुळे लोकांना मनासारखं घर मिळणं कठीण होतं. याच समस्येवर भाष्य करणारा एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Mumbai house rent
(फोटो सौजन्य – yuvraj.dua/Instagram)
UPSC किंवा JEE सारख्या परीक्षा पास करणं किती कठीण असतं, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आपल्यापैकी अनेकांनी या परीक्षांची तयारी करताना तो अनुभव घेतला असेल. पण या परीक्षांपेक्षाही मुंबईत आपल्या बजेटमध्ये आणि मनासारखं घर शोधणं अधिक कठीण आहे, असा अनुभव एका तरुणानं सांगितला आहे. मुंबईत घर शोधताना संयम, जिद्द आणि तडजोडीची खरी परीक्षा द्यावी लागते. आणि त्यात जर तुम्ही अविवाहित असाल, तर ही परीक्षा आणखी कठीण होते. या कंटेंट क्रिएटरनं अत्यंत गंमतीशीर अंदाजात मुंबईतील एका वास्तविक समस्येवर भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाला तरुण?

नेमकं काय म्हणाला तरुण?

मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणूस घर नव्यानं खरेदी करण्याऐवजी भाड्याच्या घराचा आधार शोधतो. पण घरभाडेसुद्धा कमालीची वाढली आहेत. कंटेंट क्रिएटर युवराज दुआ या व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणतो,

“एकवेळ UPSC आणि JEE सारख्या कठीण स्पर्धा परीक्षा पास होता येतील, पण मुंबईत आपल्या अपेक्षा पूर्ण करणारं आणि बजेटमध्ये बसणारं घर शोधणं हे खूप मोठं आव्हान आहे.

कारण चार वीटा आणि त्यावर एक पत्रा टाकून एक खोली तयार करतात आणि ती घर म्हणून भाड्यानं देतात.”, तो पुढे म्हणतो, जर तुमचं बजेट असेल तर चांगल्या लोकेशनवर घर मिळत नाही. आणि लोकेशन चांगलं असेल, तर घर बजेटमध्ये मिळत नाही. आणि दोन्ही अपेक्षा पूर्ण झाल्या, तर घरमालक अविवाहितांना घर देण्यास नकार देतो. जणू तो स्वतः कधीच बॅचलर नव्हता. त्यामुळे जर तुमची तडजोड करण्याची तयारी नसेल, तर तुम्ही अक्षरशः डोक्याला हात लावाल.
(फोटो सौजन्य – abshky/pexels.com)

घर शोधणं खूप कठीण का आहे?

​ ​

हा व्हिडीओ yuvraj.dua या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या शेवटी त्यानं “बॅचलर नको, दारू पिणारा नको, धूम्रपान करणारा नको, शाकाहारी हवा, रेप्टिलियन, पायथागोरियन, मेडिटेरेनियन, स्कँडिनेव्हियन, ॲम्फिबियन” अशा काल्पनिक अटींची मालिका सांगत घरमालकांच्या अपेक्षांची खिल्ली उडवली. हा व्हिडीओ आतापर्यंत ५५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, अनेकांनी प्रतिक्रिया देत तरुणाच्या विचारांशी सहमत असल्याचं म्हटलं आहे.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा