Headlines

Vijay Nikam : ‘मी आर्थिकदृष्ट्या शून्यावर आलो’, सिनेमासाठी विकली जमापुंजी, डोक्यावर लाखोंचं कर्ज; मराठी अभिनेत्यानं सांगितला कठीण काळ


Vijay Nikam Struggle : विजय निकम यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या संघर्षकाळ सांगितला आहे. विजय यांनी सिनेमाची निर्माती केलेली. मात्र, या सिनेमामुळे त्यांचं आर्थिकदृष्ट्या खूप नुकसान झालं.

Vijay Nikam Struggle Story
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुप्रसिद्ध मराठी अभिनेते विजय निकम यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये भूमिका साकारत इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे. विजय यांनी ५५ वर्ष पालिकेत नोकरी केली. मात्र, सिनेमामुळे त्यांनी सर्व काही गमावलं. विजय यांनी आई आणि बायकोचे दागिने विकले, शेतजमीनही विकली. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विजय यांनी त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे.

विजय निकम यांनी सांगितला संघर्षकाळ

मुलाखतीदरम्यान विजय निकम म्हणाले की, ‘मी आर्थिकदृष्ट्या शून्यावर आलो. आता मी त्यावर हसू शकतो, पण त्यावेळेस ते फार दुःखद होतं. पण माझ्या कुटुंबानं मला खूप सपोर्ट केला. मला असं वाटायचं, मी नाटक लिहितोय, दिग्दर्शन करतोय ते प्रेक्षकांना आवडतंय. म्हणजे मग मी सिनेमासुद्धा करेन. तो मूर्खपणा होता, खोटा अहंकार होता. मला लक्षात आलं नाही की, सिनेमा वेगळ्या अभ्यासाचा, आयुष्यभराचा विषय आहे. आयुष्य गेलं तरी सिनेमात इतकं शिकण्यासारखं आहे. मी जे काही केलं ते सोडून बाकी कोणत्याही गोष्टीसाठी आलेल्या प्रेक्षकांनी वाईट म्हटलं नाही. मी लिहिलं होतं बरं. भूमिका चांगल्या होत्या, एडिट केलं होतं. मला निसर्गतः चांगलं एडिट येतं. पण सिनेमाचं दिग्दर्शन नावाची गोष्ट मला त्यावेळी येत नव्हती. आता मला त्यावेळेपेक्षा जास्त येते. मास्टर, क्लोज एवढंच येत होतं. पण सिनेमा म्हणून जो भाव पोहोचवायचा ते नव्हतं.’

Maharashtra TimesKangana Ranaut : ‘माझ्या तारुण्याची आणि बेडरूमची स्वप्न पाहू नका, माझं चारित्र्य तुमच्यापेक्षा खूप चांगलं’, कंगनाचं रामदेव बाबांना सडेतोड उत्तर
विजय निकम पुढे म्हणाले की, ‘दोन सिनेमे, घेतलेलं कर्ज, शेती विकणं, दागिने विकणं, अशा इतरांच्या कथा ऐकलेल्या मी आणि त्यांना हसायचो. ज्यांना हसायचो तेच मी केलं आणि त्याच अवस्थेत मी गेलो. हा मोह अनावर होऊन कोणी काही करू नये असं मला वाटतं. हे आपलं क्षेत्र नाही, असं मला वाटलं. मी जर २ रुपये घातले तर किमान २ रुपये परत मिळवण्यासाठी काय करायचं, तेवढीतरी अक्कल पाहिजे, मला तीही नव्हती. निर्माता म्हणून मी आणि माझ्या मुलानं सगळं काही केलं. शेड्यूलिंगपासून, जेवणाची सोय, पाण्यापर्यंत सगळं मी आणि माझ्या मुलानं केलं. हे सगळं जुळून आलं. दिग्दर्शनात, कॅमेरामनशी सगळं व्यवस्थित केलं. पण दिग्दर्शनातील बारकावा अजिबात जमला नाही.’

Maharashtra TimesSuresh Oberoi : ‘मित्राच्या सांगण्यावरून मी भाजपमध्ये प्रवेश केलेला, राजकारणात खोटेपणा जाणवत होता’, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं वक्तव्य
‘त्यावेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा इतर कोणत्या माध्यमातून सिनेमा विकाण्याची बुद्धी झाली नाही. बिझनेस माइंड असावा लागतो किंवा बोलण्यात, वागण्यात, समोरच्याचा इगो सुखावेल असं बोलता येणं, त्याच्याकडून काम काढून घेता येणं, खोटी स्तुती करता येणं, या सगळ्या गोष्टी आजतागायत जमत नाहीत. माझं कोणाशीही वाकडं नसतं आणि मी कोणाचाही अनादर करत नाही. कोणाचा अहंकार सुखावेल असं मला वागत येत नाही, त्यामुळे अनेक माणसं दुरावली, अनेक माणसांनी धडा शिकवायचं ठरवलं. काही लोकांनी चुकीचे सल्ले दिले. मी त्यावेळेस पैसे घेतले असते तर माझं नुकसान झालं नसतं.

Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ

‘एक काळ असा होता की घरात तीन लाख रुपये शिल्लक होते आणि साडेतीन लाखांचं कर्ज होतं. पण माझ्या कुटुंबानं काय केलंस हे असं कधीच म्हटलं नाही. बायको फक्त म्हणाली, सांगितलं होतं आपल्याला माहिती नाही त्यात पडू नका आणि आमच्या मार्गाला लागलो. माझ्या ग्रॅज्युएटी फंडमधील 70 टक्के रक्कम गेली, शेती गेली, आईचे आणि बायकोचे थोडे थोडे दागिने गेले.’ असं विजय निकम यांनी शेवटी सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विजय निकम बोलत होते.