Headlines

Vaibhav Mangle : ‘ज्या प्रकारे परप्रांतीय कोकणात व्यवसाय करतायत, त्यावरून कोकणवासियांना इतर भाषा शिकाव्या लागतील’, वैभव मांगलेंचं विधान


Vaibhav Mangale Post : वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोकणातील रोजगाराच्या भीषण परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

Vaibhav Mangale Post
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेते वैभव मांगले सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात आणि सामाजिक घडामोडींवर भाष्य करतात. अशातच आता वैभव मांगले यांनी कोकणातील बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीबद्दल पोस्ट शेअर केली आहे. वैभव मांगले यांनी कोकणातील पर्यटन व्यवसाय, जमिनींची खरेदी आणि रोजगाराबद्दल काळजी व्यक्त केली आहे.

वैभव मांगले यांची पोस्ट

आजकाल परप्रांतीय लोक कोकणात व्यवसाय करताना दिसत आहेत. तसेच काही ठिकाणी कामसुद्धा करताना दिसतात. याबद्दल वैभव मांगले यांनी लिहिलं की, ‘ज्या प्रकारे कोकणात, विशेषतः किनारपट्टी भागात, उत्तरेकडील लोक मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेत आहेत, पर्यटन आणि आंबा व्यवसाय ताब्यात घेत आहेत… ज्या प्रकारे भैय्ये, नेपाळी कामगार कामाला ठेवले जात आहेत, तर नारळ काढण्यासाठी केरळमधून लोक येत आहेत. त्यावरून कोकणवासियांना लवकरच हिंदी, नेपाळी, गुजराती आणि मल्याळम भाषा शिकाव्या लागतील, असं दिसतंय.’

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

वैभव मांगले यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं की, ‘याला पूर्णपणे कोकणात स्थानिक असलेला कोकणी माणूस जबाबदार आहे, कारण त्यांना कामं करायची नाही आहेत. तुम्ही हे स्वतः अनुभवलं असेल, कारण जेव्हा आपण (चाकरमानी) कोकणात जातो तेव्हा आपण तेथील स्थानिक ग्रामस्थांना काही लहान सहान काम देतो, तेव्हा ते काहीतरी कारण सांगून ते काम करायला येत नाहीत, शेवटी आपल्याकडे पर्याय उरत नाही या परप्रांतियांना कामं देण्याशिवाय…’, तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, ‘खरी गोष्ट बोललात. पहिले ही कामं स्थानिक कोकणातील माणूसच करत होता. आता बाहेरून खास या कामासाठी माणसं येऊन कमी पैशात करून तिकडेच राहात आहेत.’

Maharashtra TimesDev Anand : झीनत अमानच्या आकंठ प्रेमात बुडालेले देव आनंद, प्रपोज करण्यापूर्वी राज कपूर यांच्यामुळे मनाला लागली ठेच, काय घडलेलं?
दरम्यान, वैभव मांगले यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘टाईमपास’, ‘चंद्रविलास’ यांसारख्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा