Crude Oil Prices Today 8 July 2026: पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव आणखी वाढताना दिसत आहे. बुधवारी पहाटे अमेरिकेच्या लष्कराने इराणवर नवीन हल्ले केले, तर याआधी होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये 3 व्यापारी जहाजांवरही केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात वॉशिंग्टनने आक्रमक भूमिका घेतली. यानंतर कच्च्या तेलाच्या बाजारात किमती वाढल्या. मात्र, भारतीय सरकारी कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही.

कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ
तीन व्यापारी जहाजांवरील हल्ल्याच्या प्रत्युत्तरात अमेरिकेने इराणवर पुन्हा सुरू केलेल्या लष्करी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत बुधवारी मोठी वाढ नोंदवली गेली. होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांवरील अलीकडील हल्ल्यांनंतर अमेरिकेने इराणच्या अनेक लक्ष्यांवर बॉम्बहल्ला केला. तसेच अमेरिकेने 60 दिवसांसाठी दिलेल्या तेलावरील सवलती रद्द करून इराणच्या तेलावर पुन्हा कठोर निर्बंध लादले. अमेरिका आणि इराण यांच्यातील अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर शत्रुत्व थांबवण्यासाठी MoU हीर केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच नवीन तणाव समोर आला.
HDFC MCLR Hike: कर्ज महागले, आता गृह आणि वाहन कर्जाचा मासिक EMI चे ओझे वाढणार; देशाच्या बड्या प्रायव्हेट बँकेचा ग्राहकांना झटका
अमेरिकेने इराणच्या लक्ष्यांवर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आणि बुधवारी सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत 4 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. त्यानंतर किंचित घट झाली आणि 2.81% वाढ होऊन प्रति बॅरल 74.22 डॉलरवर पोहोचले तर, अमेरिकेचा बेंचमार्क WTI देखील 2.91% वाढून प्रति बॅरल 72.49 डॉलरवर पोहोचला.
इराणी तेलावरील अमेरिकेची सवलत रद्द
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी होण्याऐवजी बुधवारी आणखी वाढला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यांनंतर अमेरिकेने नैऋत्य इराणमधील अनेक लक्ष्यांवर लष्करी कारवाई केली आणि त्याचबरोबर अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने इराणच्या तेल व्यापाराला दिलेली तात्पुरती सवलतही मागे घेतली असून तेल निर्यात परवाने रद्द केले आहेत.
ITR भरताना कर्ज, वारसा हक्कातून मिळालेल्या पैशांचाही उल्लेख करणे आवश्यक आहे का? नवीन नियम समजून घ्या
इराणमध्ये अयातुल्ला खामेनींचे अंत्यविधी आणि देशभरात शोकाकुल वातावरण असताना अमेरिकेकडून नवीन सैन्य कारवाई केली गेली आहे. यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Ancestral Property: वडिलोपार्जित संपत्तीवर कुणाचा हक्क? हक्क सोडपात्रातून लेकीचा हक्क मुलाला दिला मग, मुलगी दावा करू शकतो का? कोर्टाचा निकाल वाचा
अमेरिकेने इराणवर नवीन हल्ले का केले?
4 ते 9 जुलै दरम्यान इराणमध्ये खामेनींचे अंत्यविधी पार पडत असून या काळात तेहरान, कोम, मशहद आणि इतर शहरांमध्ये लाखो लोक शोकाकुल दिसले. 9 जुलै रोजी मशहद येथील इमाम रझा दर्ग्यात दफनविधीची तयारी सुरू असताना होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने नवीन सैन्य कारवाई केली. शोकसभांदरम्यान कोणतीही लष्करी कारवाई न करण्याचा इशारा इराणने आधीच दिला होता. अशावेळी, अमेरिकेच्या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीतील अलीकडेच झालेल्या 3 जहाजांवरील हल्ले अस्वीकार्य असल्याचे सांगत अमेरिकेने इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. यानंतर तणाव वाढला आणि अमेरिकेने आज हल्ला केला.

