Headlines

US Iran Conflict: दोन बड्या नेत्यांना संपवण्याचा कट! इस्रायलचा कट, अमेरिका अलर्ट; मोठा घातपात टळला, जगाला दिलासा


US Iran Conflict: दोन बड्या नेत्यांना संपवण्याचा कट इस्रायलकडून रचण्यात आला होता. याचा सुगावा अमेरिकेला लागला. त्यांनी तातडीनं सुत्रं फिरवली. यामुळे मोठा घातपात टळला.

trump and netanyahu (4)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन/तेहरान: अमेरिका आणि इस्रायल यांच्यात इराणवरुन असलेले मतभेद पुन्हा समोर आले आहेत. युद्ध थांबवण्यासाठी इराण सोबत चर्चा सुरू असताना इस्रायल दोन बड्या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करू शकतो, असा संशय अमेरिकेला होता. याच भितीनं अमेरिकेनं आखातामधील काही देशांच्या माध्यमातून इराणला संभाव्य धोक्याबद्दल इशारा देऊन त्यांना सावध केलं होतं.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, एप्रिलमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी आणि शांतता चर्चा सुरू झाली. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाघ यांच्या हत्येचा प्रयत्न इस्रायलकडून केला जाऊ शकतो. इराणच्या टॉपच्या दोन नेत्यांना संपवून संवाद खंडित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी काळजी अमेरिकेला होती. दोन नेत्यांना संपवण्यात इस्रायल यशस्वी झाल्यास युद्ध पुन्हा भडकण्याची दाट शक्यता होती.

iran abbas

इराणच्या वरिष्ठ पातळीवरील नेतृत्त्वाला संपवण्याची इस्रायलची रणनीती होती. हेच लक्ष्य ठेवून इस्रायलनं युद्धाला सुरुवात केली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यासह बड्या नेत्यांचा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. यामध्ये माजी परराष्ट्र मंत्री कमाल खराजी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित वरिष्ठ नेते अली लारिजानी यांच्यासारख्या नावांचा समावेश होता. हे दोन्ही नेते त्यावेळी अमेरिकेसोबत सुरू असलेल्या संवाद प्रक्रियेत सक्रिय होते.

इराण सोबत चर्चा सुरू राहावी, असा अमेरिकेचा प्रयत्न होता. तर इस्रायलचं प्राधान्य इराणमध्ये अस्तित्त्वात असलेली सत्तेला नेस्तनाबूत करण्याला होतं. त्यामुळे दोन मित्र देशांमधील रणनीतीमधील फरक दिसून आला. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, अब्बास अराघची आणि गालिबाफ मार्चपासूनच इस्रायलच्या रडारवर होते. पण एप्रिलमध्ये शस्त्रसंधीसाठी चर्चा सुरू होताच अमेरिकेच्या दबावानंतर इस्रायलनं दोघांची नावं हिटलिस्टमधून हटवली.

israel us iran

बाघेर गालिबाफ दोनवेळा हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावले. पहिल्यांदा २०२५ मध्ये संघर्षादरम्यान आणि दुसऱ्यांदा नुकत्याच झालेल्या युद्धावेळी त्यांना संपवण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांच्या भेटीनंतर गालिबाफ तेहरानला परतत असताना इस्रायलकडून त्यांच्या विमानावर हल्ला केला जाणार होता. पण याची माहिती इराणी गुप्तचर हेरांना मिळाली. यानंतर त्यांचं विमान आपत्कालीन स्थितीत मशहदमध्ये उतरवण्यात आलं. तिथून ते रस्ते मार्गानं तेहरानला पोहोचले.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा