Sai Sudharsan Test Century, IND A vs SL A : श्रीलंका ‘अ’विरुद्ध भारत ‘अ’ संघ अडचणीत असताना साई सुदर्शनने जबाबदारी स्वीकारत 13 चौकारांसह शतक पूर्ण केले. मालिकेतील सलग दुसऱ्या शतकामुळे त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले असून, भारताच्या आगामी दौऱ्यासाठी त्याचे स्थान अधिक भक्कम झाल्याची चर्चा आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंड दौऱ्यात फारशी छाप पाडता आली नाही त्यामुळे साई सुदर्शनवर टीकाही झाली. पण आता त्याने बॅटनेच सगळ्यांना उत्तर दिलं आहे. श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत साईने दमदार शतक झळकावत पुन्हा एकदा निवडकर्त्यांचं लक्ष वेधलं. विशेष म्हणजे, या मालिकेतील हे त्याचं सलग दुसरं शतक आहे. श्रीलंका ‘अ’ संघाने पहिल्या डावात 366 धावा केल्यानंतर भारत ‘अ’वर दबाव होता. पण सलामीला आलेल्या साईने सुरुवातीला सावध खेळ केला. नवा चेंडू जुना झाल्यानंतर त्याने गिअर बदलला आणि चौफेर फटकेबाजी सुरू केली. 166 चेंडूत त्याने शतक पूर्ण करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं.
सलग दुसऱ्या सामन्यात शतक
भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. 66 धावांवर अमन मोखाडे बाद झाला. त्यानंतर साईने एक बाजू लावून धरली. घाई न करता डाव उभारला आणि संधी मिळताच जोगदार फटके खेळले. 166 चेंडूंत शतक पूर्ण करताना त्याने 13 चौकार लगावले. याआधी पहिल्या सामन्यातही त्याने 132 धावांची खेळी केली होती. त्यामुळे सलग दोन सामन्यांत दोन शतके झळकावत त्याने आपण मोठ्या धावांसाठी तयार असल्याचं दाखवून दिलं.
श्रीलंकेच्या 366 धावांच्या प्रत्युत्तरात भारत ‘अ’ने दमदार फलंदाजी केली. दिवसअखेरीस 63 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 246 धावा झाल्या. साई सुदर्शन 104 धावांवर नाबाद आहे, तर देवदत्त पडिक्कल 94 धावांवर खेळतोय. या दोघांमुळे भारत ‘अ’ श्रीलंकेच्या धावसंख्येच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
श्रीलंका दौऱ्यापूर्वी मोठा इशारा
भारतीय वरिष्ठ कसोटी संघ ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. पहिली कसोटी 15 ऑगस्टपासून गॉलमध्ये, तर दुसरी 23 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये होणार आहे. या दौऱ्यापूर्वी साईने केलेली ही शतकी खेळी त्याच्यासाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे. आतापर्यंत भारताकडून 7 कसोटी सामने खेळताना त्याने 383 धावा केल्या आहेत. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आता आणखी वाढली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा