Headlines

Ulhasnagar Politics: महापौरांच्या पतीचे वादग्रस्त वक्तव्य; युतीत वादंग, उल्हासनगर भाजपची शिवसेनेविरुद्ध नाराजी – ulhasnagar mayor ashwini kadam husband kamlesh nikam controversial statement deepens bjp-sena rift


Ulhasnagar Shivsena-BJP: महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असून महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-15T084317
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी भाजप आमदार कुमार आयलानी यांच्याबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना-भाजप युतीत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. शहर भाजपच्या कार्यकारिणीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन निकम यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शिवसेना नेतृत्वाने निकम यांना आवर घालावा, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली.

जोपर्यंत निकम आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत शहर भाजपकडून महापालिकेत महापौर आणि शिवसेनेसोबत असहकार सुरू राहील, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी युतीतील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. निवडणुकीपूर्वी टीम ओमी कलानी गट शिवसेनेत सहभागी झाला. संख्याबळाच्या आधारे कलानी गटाचे कट्टर समर्थक असलेल्या निकम यांच्या पत्नी अश्विनी निकम यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली . टीम कलानी आणि भाजप यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असतानाही सत्तेच्या समीकरणासाठी भाजपला शिवसेनेत आलेल्या कलानी गटासोबत जुळवून घ्यावे लागले. मात्र गेल्या काही दिवसांपासून विकासकामांच्या श्रेयवादावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोड्या सुरू असल्याचे चित्र आहे.

Maharashtra TimesPrithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाह यांच्यावर टोकाची टीका, महाराष्ट्राला 40 टक्के कमिशनचे ग्रहण असल्याचा दावाउल्हासनगरमधून जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या निविदेबाबत आयलानी यांनी माध्यमांना माहिती दिली होती . त्यानंतर कमलेश निकम यांनी आमदार केवळ श्रेय लाटत असल्याची टीका केली . या वक्तव्यामुळे भाजपमध्ये असंतोष वाढला. अखेर भाजपने आमदार, जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत निकम यांच्यावर टीका केली.

Maharashtra TimesChandrashekhar Bawankule: टीका करणारे फार काळ टिकत नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना टोला… अन्यथा असहकार

उल्हासनगरमध्ये गेली अनेक वर्षे शिवसेना-भाजप युती आहे. मात्र सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेले निकम युतीत सातत्याने तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार आयलानी यांनी केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निकम यांना त्यांच्या बेजबाबदार वर्तनाबाबत समज द्यावी. अन्यथा यापुढे महापौर आणि शिवसेनेसोबत भाजप असहकाराची भूमिका घेईल, असा इशारा आयलानी यांच्यासह स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा