‘जगातील काही सर्वांत शक्तिशाली तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश असलेल्या सोशल मीडियाच्या वापरावर अशी बंदी लादणे सोपे नाही,’ हे त्यांनी मान्य केले. परंतु, मुलांचे आरोग्य आणि कल्याण हे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे स्टार्मर म्हणाले. ‘आज आपल्या देशासाठी एक मोठा क्षण आहे. हे एक मोठे पाऊल आहे, आपल्या मुलांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी एक खरा बदल आहे.
US Iran Peace Deal: ट्रम्प यांचा दावा फुसका! US-इराण करारात अखेरच्या क्षणी गेम; होर्मुझचा विषय जगाला ‘महागात’ पडणार
देशात १६ वर्षांखालील सर्व मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यात येत आहे,’ असे त्यांनी जाहीर केले. ‘मी हा निर्णय सहजपणे घेतलेला नाही. सोशल मीडियामुळे तरुणांना कोणताही फायदा झालेला नाही, असेही माझे म्हणणे नाही. परंतु, सध्या या वयोगटासाठी संपूर्ण बंदी हाच योग्य निर्णय आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
Nigeria Politics: मी बुटका हाय! 16 वर्षीय ‘छोटा पुढारी’ खासदारकी लढवण्याच्या तयारीत; पण शिक्षकामुळे भलताच ट्विस्ट
टिकटॉक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम आणि यूट्युब यांसारख्या सोशल मीडिया ॲपच्या हानिकारक परिणामांमुळे ज्यांच्या मुलांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे, अशा पालकांसह कार्यकर्त्यांच्या मतांचा समावेश असलेल्या एका दीर्घ सल्लामसलत प्रक्रियेनंतर ही घोषणा करण्यात आली. व्हॉट्सॲपसारख्या मेसेजिंग ॲपचा या बंदीमध्ये समावेश होणार नसला, तरी गेमिंग सेवा आणि लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर निर्बंध लादले जातील, असे सांगण्यात आले.
‘प्रामाणिकपणे सांगायचे तर, माझ्या स्वतःच्या मुलांसाठी मला नेहमीच एकच गोष्ट हवी होती. ती म्हणजे ते आनंदी आणि सुरक्षित असावेत. मला वाटते की, प्रत्येक पालकाला हेच हवे असते,’ असे स्टार्मर म्हणाले. ‘सोशल मीडिया मुलांना दुःखी करीत आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

