Tukaram mundhe launches food safety campaign in schools inspections of canteens and nutrition meals to follow; तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शाळांकडे! थेट कॅन्टीनमध्ये धडकणार, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हाती घेतली खास मोहीम
Tukaram mundhe launches food safety campaign in schools inspections of canteens and nutrition meals to follow; तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शाळांकडे! थेट कॅन्टीनमध्ये धडकणार, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हाती घेतली खास मोहीम
पुणे: दुधासह विविध पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी राज्यभरात सुरू असलेल्या धाडसत्रानंतर आता तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासन विभागाने आपला मोर्चा शालेय पोषण आहाराकडे वळवला आहे. खासगी शाळांमधील उपहारगृहांमधून विद्यार्थ्यांना कशा प्रकारचा आहार दिला जातो, याबाबतची तपासणी करण्याची मोहीम एफडीएने हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, यासाठी एफडीएने आता पुढाकार घेतला असून नुकतीच मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली.
अन्न व औषध प्रशासन विभागाने शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी तसंच मध्यान्ह भोजन तयार करून पुरवणाऱ्या विविध घटकांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेतल्या आहेत. या बैठकांतून शाळांना अन्नसुरक्षा नियम, स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबतचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश या बैठकांमध्ये देण्यात आले आहेत.
शुक्रवारी मुंबईत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगारवाड यांनी अन्न सुरक्षा अधिनियम, 2020 ची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त करत महत्त्वाच्या सूचना दिल्या. शाळांसह भोजन पुरवठादारांनी स्वच्छता राखणं, अन्नसुरक्षा सुनिश्चित करणं आणि विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देणं, ही त्यांची जबाबदारी असल्याचंही सिंगारवाड यांनी म्हटलं आहे.
“अन्नसुरक्षेबाबत असलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. गेल्या काही वर्षांत मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. काही प्रकरणांमध्ये जेवणात अळ्या तसेच इतर दूषित घटक आढळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसंच अनेक शाळांच्या कँटीनमध्ये अस्वच्छतेच्या तक्रारीही नोंदवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत अन्न व औषध प्रशासनाने शाळांना सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, शाळांपासून 500 मीटर परिसरात स्टिंग या कंपनीच्या पेयावर राज्य सरकारने नुकतीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ही मोहीम आणखी तीव्र केली आहे.
दरम्यान, नागरिकांना एखाद्या ठिकाणी काही संशयास्पद हालचाली आढळल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करण्याचं आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आलं आहे.
एफडीएची रक्तपेढ्यांवर मोठी कारवाई
रक्तचोरी प्रकरणातील जे. जे. महानगर रक्तपेढीचा परवाना रद्द केल्यानंतर, ‘एफडीए’ने राज्यातील १९ रक्तपेढ्यांचे परवाने रद्द केले आहेत. रक्तपेढ्यांना देण्यात आलेल्या निकषांचे काटेकोर पालन न केल्याने आणि गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. रक्तकेंद्राचा परवाना रद्द करताना सौम्य, गंभीर आणि अतिगंभीर अशा तीन स्तरांवर दखल घेऊन निर्णय घेतला जातो. रक्तसंकलन, साठवणूक, वितरण, शीतसाखळीचे व्यवस्थापन, रक्तकेंद्रामध्ये येणाऱ्या रक्तपिशव्यांचे ऑडिट, रक्तशिबिरांचे आयोजन करताना पाळावयाचे निकष, रक्तसंसर्ग असलेल्या रुग्णांना करण्यात येणाऱ्या रक्ताची उपलब्धता, शासकीय निर्देशांचे पालन याची सखोल व कसून पाहणी केली जाते. रक्तकेंद्रे आणि रक्त साठवणूक केंद्रांमध्ये विविध ठिकाणी ‘एफडीए’ने केलेल्या पाहणीमध्ये या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथील रक्तकेंद्रे आणि रक्त साठवणूक केंद्रांकडून नियमभंग झाल्यामुळे परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. रक्तपेढ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र सहायक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा