Headlines

Tukaram mundhe fda action against dominos pizza outlets licenses revoked in mumbai and satara; तुकाराम मुंढेंचा आता मोठ्या कंपन्यांना दणका; मुंबईसह राज्यभरात डॉमिनोज् पिझ्झाच्या ५ आऊलेटचा परवाना रद्द


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: तुकाराम मुंढे याच्या नेतृत्वात अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरातील आस्थापनांची तपासणी करण्यात येत असून एफडीएने आता आपला मोर्चा मोठ्या ब्रॅण्ड्सकडेही वळवला आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने मुंबईतील ‘डॉमिनोज पिझ्झा’च्या तीन आउटलेटचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसंच सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील आउटलेटसह मलकापूर येथील आउटलेटचा परवानाही रद्द करण्यात आला आहे.

मुंबईतील विलेपार्ले येथील आउटलेटच्या तपासणीत ‘एफएसएसएआय’ परवाना प्रदर्शित न करणे, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीशी संबंधित नोंदी उपलब्ध नसणे, अन्नसाठवणूक, कीटक नियंत्रण आणि स्वच्छता सुविधांमध्ये त्रुटी आढळल्या. अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी आवश्यक तापमान नियंत्रण आणि तपासणीची योग्य व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले.

घाटकोपर येथील आर-सिटी मॉलमधील आउटलेटमध्ये कीटक नियंत्रणाच्या प्रभावी उपाययोजना आणि संबंधित नोंदी उपलब्ध नव्हत्या. अन्नसाठवणुकीत निकषांचे पालन न करणे, तापमान नियंत्रणाचा अभाव आणि स्वच्छता निकषांची पूर्तता न करणे अशा त्रुटीही आढळल्या. खाद्यपदार्थांच्या संपर्कात येणाऱ्या साहित्याची प्रमाणपत्रे, कर्मचाऱ्यांच्या स्वच्छता व वैद्यकीय तपासणीच्या नोंदी, तसेच अन्न आणि पाण्याच्या तपासणीचे अहवालही संबंधित आउटलेट सादर करू शकले नाहीत.

दरम्यान, बोरिवली येथील आउटलेटमध्येही अन्नसाठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि खाद्यपदार्थ हाताळणीसंदर्भातील नियमांचे पालन झालेले नव्हते.

चार आयुर्वेदिक औषध उत्पादकांचे परवाने रद्द

राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची व्यापक तपासणी मोहीम राबविताना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गोंदिया जिल्ह्यातील चार आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० तसेच नियम, १९४५ अंतर्गत परिशिष्ट-‘टी’मधील तरतुदींचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने या चार कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. ही तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मे, जून व जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील एकूण पाच आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी करण्यात आली होती.

तपासणीनंतर अंग्रास आयुर्वेद (वाडेगाव, ता. तिरोडा), आदित्य फार्मास्युटिकल्स (गराडा, ता. तिरोडा), लालशाह सेंद्रिय उत्पादने (पिंडकेपार, कारंजा) आणि हिलॅरियस आयुर्वेद (गोंदिया औद्योगिक क्षेत्र) या चार कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. तर, पाठक आयुर्वेदिक फार्मसी (रेलटोली, गोंदिया) यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटिसीवरील कार्यवाही अद्याप सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

कारवाईपूर्वी संबंधित कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. कंपन्यांनी लेखी खुलासे सादर केले असले, तरी आढळलेल्या उल्लंघनांचे गांभीर्य लक्षात घेऊन औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले. जनस्वास्थ्याच्या हितासाठी ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत