Headlines

Trump Warns Iran: ‘आता तर थेट बॉम्बच टाकू!’ शांतता करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वीच ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी


Trump Warns Iran: जी ७ शिखर परिषदेत अरब रिपब्लिक ऑफ इजिप्तच्या अध्यक्षांसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान बोलताना ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की, कराराच्या अंतिम स्वरूपाबद्दल ते समाधानी नसतील तर अमेरिका पुन्हा बॉम्बहल्ल्यांचा मार्ग स्वीकारेल.

donald trump
डोनाल्ड ट्रम्प(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, एव्हियन-ले-बाँ (फ्रान्स): इराणसोबत होणाऱ्या महत्त्वपूर्ण शांतता करारावर स्वाक्षरी करण्याच्या केवळ ४८ तास आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा हल्ल्यांचा इशारा दिला. इराणसोबतचा सामंजस्य करार (एमओयू) अद्याप अंतिम झालेला नाही आणि समाधानकारक करार न झाल्यास इराणवर पुन्हा हल्ले सुरू करू, असा इशारा ट्रम्प यांनी बुधवारी जी ७ परिषदेत बोलताना दिला.

‘ सामंजस्य करार मला आवडला नाही, तर आम्ही पुन्हा बॉम्बहल्ले सुरू करू’, असे ट्रम्प म्हणाले. तसेच, युद्धानंतर इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका किमान ३०० अब्ज डॉलर्स उभारेल, असे या करारात नमूद करण्यात आल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळून लावले. ‘ते वृत्त खोटे आहे. अमेरिका असा कोणताही निधी उभारणार नाही’, असे ट्रम्प म्हणाले.

Maharashtra TimesGiorgia Meloni: मी सिगारेट सोडली! मेलोनींचं उत्तर ऐकून G-7 नेत्यांचा एकच सवाल; सगळे खळखळून हसले
अमेरिका आणि इराण यांच्यातील करार आता अंतिम झाला आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता ट्रम्प म्हणाले, ‘तो अंतिम करार नाही. हा केवळ सामंजस्य करार आहे आणि मला तो आवडला नाही, तर आम्ही पुन्हा त्यांच्यावर गोळीबार करायला, त्यांच्या डोक्यावर बॉम्ब टाकायला सुरुवात करू. मला करार आवडला नाही आणि ते नीट वागले नाहीत, तर आम्ही पुन्हा थेट त्यांच्या डोक्याच्या बरोबर मध्यभागी बॉम्ब टाकायला सुरुवात करू. ठीक आहे? कारण ते ४७ वर्षांपासून गैरवर्तन करत आहेत.’
Maharashtra TimesUK Social Media Ban: सोळा वर्षांखालील मुलांना ब्रिटनमध्येही ‘सोशल’बंदी; अ‍ॅप वापरावर निर्बंधाची पंतप्रधान स्टार्मर यांची घोषणा
शांतता कराराचा मसुदा जाहीर
कित्येक दिवसांच्या गोपनीयतेनंतर अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री इराणसोबतच्या करारातील तपशील जाहीर केला. शुक्रवारी होणाऱ्या औपचारिक स्वाक्षरी समारंभापूर्वी या मसुद्यातील तरतुदी अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटींवर सांगितल्या. मसुदा करारात इराणच्या उच्च समृद्ध युरेनियमच्या डाउनब्लेंडिंगसाठी नवे ‘किमान’ प्रमाण समाविष्ट असून, लेबनॉनच्या भूभागात हिजबुल्लाहविरुद्ध इस्रायलने केलेल्या ताज्या हल्ल्यांनंतर लेबनॉनच्या ‘प्रादेशिक अखंडतेची’ खात्री देण्याची तरतूद आहे. त्या बदल्यात, करारावर स्वाक्षरी होताच अमेरिका इराणवरील काही व्यापक निर्बंधांना रद्द करण्याऐवजी स्थगिती देईल.

Maharashtra TimesUS Russia Bombers Crash: अमेरिका, रशियाला एकाच दिवशी जबर धक्का; महाविध्वंसक बॉम्बर्स क्रॅश; विचित्र योगायोगानं जग चकित
कराराच्या अमेरिकी मसुद्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केवळ ६० दिवसांसाठी विनाशुल्क मार्ग सुनिश्चित केला आहे आणि भविष्यात शुल्क आकारण्यावर त्यात उल्लेख नाही. दरम्यान, इराणने अद्याप मसुदा जाहीर केलेला नाही. मात्र, करारावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्वाक्षरी कराव्यात, असे सूचित केले आहे. करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल. तसेच, इराणला कोणत्याही निर्बंधांशिवाय तेल विकण्यास परवानगी असेल. इराणच्या पुनर्बाधणीसाठी अमेरिका किमान ३०० अब्ज डॉलर्स उभारेल, असेही आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा