Headlines

Trump 200% Tariff Impact On Pharma Stocks; Share Market वर 200% टॅरिफचा घाव; ट्रम्प यांच्या घोषणेचे मुंबई शेअर बाजारात पडसाद; फार्मा स्टॉक्स गडगडले


Stock Market Fall Today: बुधवार, 22 जुलै रोजी, देशांतर्गत शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरणीच्या लाल रंगाचे वर्चस्व कायम राहिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने टॅरिफ जाहीर केले, ज्याचा परिणाम औषध कंपन्यांवर फार्मा कंपन्यांच्या शेअर्समधील या घसरणीमागे अमेरिका कनेक्शन स्पष्ट आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांवर टॅरिफचा बॉम्ब फोडला आणि या औषधांवर 200% पर्यंत आयात शुल्काची घोषणा केली. सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, 1 ऑगस्ट 2026 पासून दोन वर्षांसाठी या सर्व औषधांवर शून्य टॅरिफ आकारले जाईल, पण त्यानंतर, एका वर्षासाठी 100% आणि नंतर 200% असे टप्प्याटप्प्याने आयात शुल्क आकारण्याच्या शक्यतेमुळे देशांतर्गत बाजारावर दबाव वाढला.

Maharashtra TimesChina AI Plan: चीनचा एआयच्या माध्यमातून जगावर राज्य करण्याचा गेमप्लॅन; भारतासह सर्वांसमोर मोठे संकट उभे करणार?; एका चालीने चेकमेट करणार
बाजारातील घसरणीदरम्यान बहुतांश औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून अरविंदो फार्मापासून ते सिप्ला आणि सन फार्मापर्यंत कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण दिसून आली.

लाल रंग शेअर बाजाराची पाठ सोडेना

बुधवारी शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच बीएसई सेन्सेक्स आदल्या दिवशीच्या 77,470 च्या बंद भावापेक्षा घसरून 77,385 वर उघडला आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता 600 हून अधिक अंकांनी घसरून 76,860 वर पोहोचला. मुंबई शेअर बाजारापाठोपाठ एनएसई निफ्टी50 निर्देशांकही ढासळला. NSE निर्देशांक मंगळवारच्या 24,187 च्या बंदवरून किंचित घसरून 24,150 वर उघडला, पण नंतर घसरण वाढली आणि सध्या सुमारे 170 अंकांनी घसरून 24,011 वर व्यवहार करत होता. शेअर बाजारातील घसरणीदरम्यान फार्मा कंपन्यांचे शेअर्समध्ये आपटी झाली आणि बहुतांश शेअर्स घसरणीच्या लाल रंगात व्यवहार करू लागले.

Maharashtra TimesGold Silver Price Hike Today: सराफा बाजार उघडताच दरांमध्ये मोठी उलथापालथ; सोने, चांदीची पुन्हा तेजीच्या दिशेने कूच, आजचा दर पाहूनच खरेदी करा
यापैकी ल्युपिन आणि ग्लँड फार्माचे शेअर्स सर्वाधिक 3% घसरणीसह व्यवहार करत आहेत. तसेच ऑरोबिंदो फार्मा शेअर 2.80%, अल्केम शेअर 2.50%, झायडस 2.30%, सिप्ला 2.10%, ग्लेनमार्क फार्मा 1.80%, मॅनकाइंड फार्मा 1.75% घसरणीसह व्यवहार करत आहेत.

दुसरीकडे, सेन्सेक्समध्ये इंडिगोला सर्वाधिक फटका बसला. याशिवाय सन फार्मा, इन्फोसिस, टेक महिंद्रा, SBI, HCFC बँक, ICICI बँक, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह आणि बीईएल या शेअर्समध्येही लक्षणीय घसरण दिसून आली. याउलट मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, ट्रेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि इटरनल वाढीसह व्यवहार करत आहेत.

Maharashtra TimesC Vijayakumar: भारतीय IT उद्योगातील सर्वात महागडे CEO, महिन्याला 48 लाख पगार; ना TCS, ना इन्फोसिस, तिसऱ्याच कंपनीचा सीईओ सर्वात धनवान

फार्मा स्टॉक्सवर ट्रम्प टॅरिफचा वार

फार्मा कंपन्यांच्या शेअर्समधील या घसरणीमागे अमेरिका कनेक्शन स्पष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांवर टॅरिफचा बॉम्ब फोडला आणि या औषधांवर 200% पर्यंत आयात शुल्काची घोषणा केली. सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, 1 ऑगस्ट 2026 पासून दोन वर्षांसाठी या सर्व औषधांवर शून्य टॅरिफ आकारले जाईल, पण त्यानंतर, एका वर्षासाठी 100% आणि नंतर 200% असे टप्प्याटप्प्याने आयात शुल्क आकारले जाईल.

अशाप्रकारे, दोन वर्षांसाठी फार्मा कंपन्यांना टॅरिफमधून दिलासा मिळाला तरीही दोन वर्षांनंतर 100% आणि मग 200% टॅरिफची भीती भारतीय औषध कंपन्यांमध्ये स्पष्ट दिसून आली, ज्यामुळे कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.