Headlines

Tree Fell On Urvashi Dholakia Son Kshitij Car Due To Heavy Rain ; Urashi Dholakiya : मुसळधार पावसात अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या लेकाच्या गाडीवर पडलं झाड! थोडक्यात वाचला जीव, व्हिडिओ समोर


मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यंदा पाऊस उशीरा सुरू झाला असला तरी तो इतका कोसळतोय की उशीरा आल्याची सर्व कसर भरुन निघत असल्याचे चित्र उभे ठाकले आहे. या मुसळधार पावसात गेल्या काही दिवसांत काही दुर्घटना घडल्याच्या वार्ताही समोर आल्या होत्या. अशातच टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या बाबतीत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीचा मुलगा आणि अभिनेता क्षितिज ढोलकिया मुसळधार पावसात एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे.

मुसळधार पावसामुळे, पार्क केलेल्या त्याच्या कारवर अचानक एक मोठे झाड कोसळले, ज्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या घटनेच्या वेळी क्षितिज गाडीत नव्हता आणि कोणालाही दुखापत झाली नाही.

Maharashtra TimesDevendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेटफ्लिक्सवर पाहतायत द ब्लॅकलिस्ट सीरिज, टेलिव्हिजनवरील रिअ‍ॅलिटी शोचेही मोठे चाहते
या घटनेनंतर, क्षितिजने सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले, ज्यामध्ये झाडाखाली दबलेली त्याची कार दिसत आहे. या व्हिडिओंमध्ये अग्निशमन दलाचे जवान आणि इतर अधिकारी झाड बाजूला काढण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत.

क्षितिजने सांगितले की, त्याची कार वाईटपणे त्या झाला खाली अडकली आहे. तिचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याने त्यांचे आभार देखील मानले. क्षितीजने लिहिले की, ही घटना आयुष्य किती अनपेक्षित असू शकते याची आठवण करून देते. मी स्वतःला नशीबवान समजतो कारण अपघाताच्या वेळी मी कारमध्ये नव्हतो.

क्षितीजच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, क्षितिज ढोलकियाने एकता कपूरच्या ‘नागिन 7’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनयात येण्यापूर्वी त्याने चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते आणि ‘हमशकल्स’ व ‘ड्रीम गर्ल’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीशी संबंधित टीमचा तो भाग होता.

Maharashtra TimesTharala Tar Mag : साडेतीन वर्षांची मेहनत पाण्यात गेल्याचं समजताच हादरली प्रिया, अखेर सायली हीच तन्वी असल्याचा सुभेदार किल्लेदारांसमोर खुलासा
उर्वशी ढोलकियाबद्दल सांगायचे तर, ती ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील ‘कोमोलिका’च्या भूमिकेसाठी ओळखली जाते. याव्यतिरिक्त, तिने कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस 6’ (2012) हा रिअ‍ॅलिटी शो जिंकला होता.

शहरातील अनेक भागांत पाणी साचले

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे; तसेच याचा फटका बॉलीवूड आणि टीव्ही क्षेत्रातील कलाकारांनाही बसला आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली रमली जुन्या आठवणीत आणि काय म्हणाली जुई गडकरी

अलीकडेच, ‘बिग बॉस 19’ फेम अशनूर कौरच्या आलिशान घरात पावसाचे पाणी शिरले, ज्यामुळे तिच्या सामानाचे मोठे नुकसान झाले. अशनूरने या परिस्थितीचा एक व्हिडिओही शेअर केला होता. अभिनेता रणदीप हुड्डा ही पावसातले ट्रॅफिक टाळण्यासाठी मेट्रोने प्रवास करताना दिसला. बिग बींच्या कोच्यवधींच्या जलसा मध्येही पाणी शिरल्याचे व्हिडिओ समोर आले.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत