Tharala Tar Mag 30 June 2026 Episode : आजच्या एपिसोडमध्ये अस्मितासाठी तिचे वडील खंबीरपणे उभे राहतात . तर सायलीच्या अपघाताच्या प्लॅनिंगला देवाचाही कौल मिळाला असतो.

दुसरीकडे अस्मिता आपल्या वडिलांना सर्व काही सांगते. मध्यंतरीच्या काळात ती कशी इंटरव्यूला जायची यावेळी चैतन्य तिला मदत करत होता. ती इंटरव्यू देत असताना गोलूला तो सांभाळायचा. प्रताप तिला विचारतो की एवढं सगळं घडलं पण तुला माझ्याशी बोलावसं वाटलं नाही का? यावरती म्हणते की मला तुमची आठवण येत होती पण तुम्हीच आपल्या ऑफिसच्या कामात इतके बिझी होता त्यामुळे मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं. सायली शी बोलून मला बरं वाटतं पण ती सुद्धा तिथे होती त्यामुळे मला तिलाही टेन्शन द्यायचं नव्हतं म्हणून मी चैतन्यशी शेअर केलं आणि मग त्याने मला मदत केली. ती आपल्या वडिलांना पटवून देते की तिला या नोकरीची का गरज आहे तेव्हा ते स्वतःच्या मित्राच्या कंपनीत तिला जॉब मिळवून देतात. आपल्या वडिलांनी मदत केलेली पाहून अस्मिता खूप खुश होते.
Jasmine Sandlas : 8 च्या कार्यक्रम रात्री 11.20 ला सुरू, शिवाय गाण्याच्या नावाखाली नुसती लिपसिंक! धुरंधर फेम गायिका जस्मिन सँडलासवर फसवणूकीचे आरोप
दुसरीकडे कल्पना मात्र अस्मिताच्या या निर्णयाने खूप नाराज असते. अश्विन तिला समजावत असतो. ती आता केवळ एक मुलगी नसून एका बाळाची आई सुद्धा आहे आणि तिला आता त्याचा बाबा सुद्धा व्हायचा आहे. इतक्या वर्षांनी ती स्वतःच्या पायावर उभी राहू पाहते तर तू तिला अडवू नकोस. त्यानंतर प्रताप सुद्धा तिथे येऊन तिला जॉब देण्यासाठी मदत केल्याचा सांगतात ते ऐकून कल्पनाला आश्चर्य वाटतं. पण सगळे अस्मिताच्या नोकरीच्या बाजूने असल्याने कल्पना मात्र नाराज होते. तिला गोलू ची काळजी वाटत असते. ते वापरतात तिला म्हणतो की आई झाल्यावर तीच अस्तित्व समता असं नाही. बाई कधीही तिच्या पायावर उभी राहू शकते.
दुसरीकडे अस्मिता आणि पूर्णा आजी आपल्याला भेटायला येणार हे समजल्यावर सायली थोडी घाबरते कारण त्या आल्या तर तिला अपघात पुन्हा घडवतात येणार नसतो. त्यामुळे ती अर्जुन ला फोन करून त्या दोघींना अडवायला सांगते. खरतर अर्जुन ला त्यांना अडवायचं नसतं कारण त्याच्याही मनात त्या अपघाताबद्दल धाकधूक असते. जर अस्मिता आणि आजी तिथे गेला तर कदाचित अपघात अडू शकतो असा विचार तो करत असतो पण सायली मात्र ऐकत नसते.
Akanksha Chamola Gaurav Khanna Divorce : गौरवला मूल हवंय अन् मला नको! लॉकअप 2 च्या तिसऱ्याच एपिसोडमध्ये आकांक्षा चमोलाने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण
दुसरीकडे कल्पनातेच्या रूममध्ये रडत बसलेली असते. आपल्या मुलांना आपल्याबद्दल गैरसमज झाला त्यासाठी तिला वाईट वाटत असतं. तितक्यात प्रताप तिला येऊन समजावू लागतो पण अस्मिता आपल्याशी बोलायला आली नाही याचं तिला वाईट वाटत असतं. तितक्यात अस्मिता स्वतः तिथे येते आणि कल्पनाची माफी मागते. तिला हा जॉब किती महत्त्वाचा होता हे तिला नीट समजावून सांगते. अस्मिता स्वतः बोलायला आल्यामुळे कल्पना खूप खुश होते आणि त्यांच्यामध्ये आलेली कटूता पुन्हा दूर होते. अस्मिता आपल्या आई-वडिलांचे आभार मानते.
त्यानंतर घरातले सगळे सायलीला भेटण्यासाठी निघतात. अस्मिता सायलीला फोन करून त्याची पूर्वकल्पना देत असते त्यामुळे सायली थोडी अर्जुनवर चिडते कारण तिने त्याला बजावलं होतं की त्या तिघींना इथे येण्यापासून आडवा पण तरीही त्याने हे काम केलं नव्हतं. मग सायली आजारी पडल्याचं नाटक करते. आराम करायचा आहे असं सांगून त्यांना उद्या यायला सांगते.
मोनिकाच्या नवऱ्यानं ‘ठरलं तर मग’ मालिकेतील तिच्या नवऱ्याला काय सल्ला दिला?
थोड्या वेळाने अर्जुन बाहेर येऊन चालायचं का असं सगळ्यांना विचारतो पण त्या सांगतात की सायलीची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही उद्या जायचं ठरवलं आहे. तेव्हा अर्जुन ला आश्चर्य वाटतं कारण की सकाळी बरी होती म आता अचानक तिला काय झालं हे समजत नसतं. तो विचार करतो की सायलीची विल पावर खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे हा अपघात रिक्रिएशनचा प्लॅन जर झाला तर नक्की त्यातून काहीतरी चांगलं होईल. सायली सुधा मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत असते की हा अपघात झाला तर मला माझ्या कुटुंबाबद्दल सगळं कळेल नेमकं त्याचवेळी देवाकडचा फुल खाली पडतात त्यामुळे तिला सकारात्मक कौल मिळतो.

