जर तुम्हा टाटाची Harrier आणि Safari खरेदी करत असाल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. होय, टाटाने या दोन्ही कार नवीन अवतारात लाँच केल्या आहेत. विशेष म्हणजे जुन्या ग्राहकांना फ्री ADAS अपग्रेड देखील मिळणार आहे.

टाटा सफारी आणि हॅरियरमध्ये आधीच अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, रियर कोलिजन वॉर्निंग, ट्रॅफिक साइन रेकग्निशन, हाय बीम असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन चेंज अलर्ट, रियर क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट आणि डोअर ओपन अलर्ट अशा अनेक सेफ्टी फीचर उपलब्ध आहेत. तसेच, लेव्हल 2 एडीएएसच्या अपडेटसह, टाटा सफारी आणि हॅरियरमध्ये आता अॅडॉप्टिव्ह स्टीअरिंग असिस्ट विथ लेन कीप असिस्ट आणि लेन सेंटरिंग सारख्या सेफ्टी फीचरचा समावेश करण्यात आला आहे. लेन सेंटरिंग फीचर फक्त AT व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
फ्रीमध्ये मिळणार ADAS अपग्रेड फीचर
टाटा सफरी आणि हॅरियरमध्ये आता नवीन कलर ऑप्शन ग्राहकांना मिळेल. टाटा हॅरियर आणि सफारीच्या अॅडव्हेंचर + ए, फियरलेस + अकम्प्लिश्ड + व्हेरिएंटसाठी लेव्हल 2 एडीएएस अपडेट्स फीचर दिले आहे. ज्यांच्याकडे आधीच हे व्हेरिएंट असेल त्यांना ADAS अपग्रेड फीचर फ्रीमध्ये मिळणार आहे.
सफारी आणि हॅरियरमध्ये नवीन कलर ऑप्शन
टाटाने आता सफारी आणि हॅरियर ग्राहकांसाठी अनेक कलर ऑप्शन लाँच केले आहेत. ज्यात कोरल रेड आणि पेबल ग्रे चा समावेश आहे. आधी हे कल हॅरियर अॅडव्हेंचर आणि फियरलेस व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होते, परंतु आता हे कलर टाटा हॅरियरच्या प्युअर आणि स्मार्ट व्हेरिएंटमध्ये देखील मिळतील. तसेच, अॅश ग्रे कलर आधी फक्त स्मार्ट आणि प्युअर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होता, परंतु आता हा कलर अॅडव्हेंचर आणि फियरलेस व्हेरिएंटमध्ये देखील उपलब्ध असेल. टाटा सफारीमध्येही नवीन कलर ऑप्शन लाँच करण्यात आले आहे. साफारीच्या प्युअर आणि अॅडव्हेंचर व्हेरिएंटमध्ये आता स्टारडस्ट अॅश आणि गॅलेक्टिक सैफायर कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. सफारीच्या अॅकम्प्लिश्ड व्हेरिएंटमध्ये आता सुपरनोव्हा कॉपर थीमचा समावेश आहे.

