Headlines

Swimming Pool Full Gardens Green But No Water in Homes Luxury Society Video Goes Viral | ‘२ कोटींचे फ्लॅट पण पाण्याचा थेंबही नाही’, आता श्रीमंत लोकंसुद्धा उतरले रस्त्यावर, लक्झरी सोसायटीमधील व्हिडीओ व्हायरल


Swimming Pool but no Water at Home: कोट्यवधी रुपये किमतीचे फ्लॅट्स असलेल्या आलिशान सोसायटीमध्ये स्विमिंग पूल आणि गार्डनसाठी पाणी उपलब्ध आहे. पण लोकांच्या घरामध्ये मात्र पाणी नाही. हे वास्तव दाखवणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोक पाण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

luxury society water shortage
(फोटो सौजन्य – sweetyonesweetysharma/Instagram)
लोकं कोट्यवधी रुपये खर्च करून लक्झरी फ्लॅट घेताना दिसतात. कारण वर्षानुवर्षे आर्थिक संघर्ष केल्यानंतर आयुष्याचा उत्तरार्ध तरी निवांत जावा आणि स्वतः केलेला संघर्ष मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून लोकं मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये फ्लॅट खरेदी करतात. बरं, या लक्झरी सोसायट्यांमध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा असतात. पण पाण्याची समस्या काही सुटत नाही. होय, ही केवळ एक कल्पना नसून हे वास्तव दाखवणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या महिलेच्या सोसायटीमध्ये स्विमिंग पूल पाण्यानं भरलेला आहे. गार्डनमधील झाडं हिरवीगार ठेवण्यासाठी पुरेसं पाणी आहे, पण त्यांच्या घरातल्या नळातून थेंबभरसुद्धा पाणी येत नाही.

घरात थेंबभर पाणी नाही

​ ​

हा व्हिडीओ sweetyonesweetysharma या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला आपल्या आलिशान सोसायटीची दृश्यं दाखवत आहे. या सोसायटीमध्ये जीम, मुलांसाठी प्लेग्राऊंड, हिरव्यागार झाडा-झुडपांनी नटलेलं सुंदर गार्डन आणि भलामोठा स्विमिंग पूलसुद्धा आहे. पण त्यांच्या घरात मात्र पाणी नाही. ती व्हिडीओच्या शेवटी सांगतेय की, या सोसायटीमध्ये कुठलाच फ्लॅट १ कोटी रुपयांच्या खाली नाही. पण कोट्यवधींच्या या घरांमध्ये थेंबभरसुद्धा पाणी येत नाहीये. लक्षवेधी बाब म्हणजे, तिनं आपला दावा सिद्ध करण्यासाठी सिंकचा नळदेखील फिरवून दाखवला. पण त्यामधून पाणी काही आलं नाही.

पाण्यासाठी लोकं उतरली रस्त्यावर

​ ​

हा व्हिडीओ ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. विशेष म्हणजे, महिलेने यानंतर आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामध्ये सोसायटीमधील लोकं पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेली दिसत आहेत. हा व्हिडीओसुद्धा ७० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. या व्हिडीओंवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी आश्चर्य व्यक्त करतंय, कारण कोट्यवधींचे फ्लॅट खरेदी करणारी लोकं आर्थिकदृष्ट्या नक्कीच सधन आहेत. तर दुसरीकडे, काही लोक आंदोलन तीव्र करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा