Headlines

Sushma Andhare: मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा; सुषमा अंधारेंची मागणी – negligence in moshi accident suspend to municipal commissioner sushma andhare demands


Sushma Andhare: अंधारे यांनी रविवारी (१३ जुलै) जखमी कामगारांसह आणि मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरप्रमुख चेतन पवार या वेळी उपस्थित होते.

andhare
मोशी दुर्घटना(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, पिंपरी: ‘मोशी कचरा डेपो येथे पाच जून रोजी चिमणी पडण्याची घटना घडली होती. महापालिका आयुक्त, प्रकल्प अधिकारी यांनी तेव्हाच या घटनेचे गांभीर्य ओळखून उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र, तसे झाले नाही. महापालिका आयुक्त आणि प्रकल्प अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे नऊ बळी गेले आहेत. त्यांना निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा,’ अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

अंधारे म्हणाल्या, ‘मोशी कचरा डेपो येथील दुर्घटना ही मानवनिर्मित आहे. पाच जून रोजी या ठिकाणी प्रकल्पाची चिमणी पडली होती. हा अपघात का झाला, याची साधी चौकशीही अधिकाऱ्यांनी केली नाही. डेपोच्या शेजारी एक खाण आहे. त्यात स्फोट केले जातात. त्याचा या कचऱ्याच्या डोंगरावर काही परिणाम होतो का, हेही पाहिले गेले नाही. याउलट त्या ठिकाणी अनधिकृत इमारत उभी केली. तळमजला बांधण्याची परवानगी असताना दोनमजली इमारत बांधली. या इमारतीला सुरक्षा भिंतही नव्हती.’

Sushma Andhare |मोशी दुर्घटना प्रकरणी पालिका आयुक्त, प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

‘ते’ कोणाला वाचवताहेत?
‘आयुक्त दुर्घटनेबाबत काही बोलत नाहीत, यात दोष कोणाचा, अनधिकृत बांधकाम होते, का नाही याबाबत अधिकृत बोलत नाही. ते कोणाला वाचवत आहेत, कचरा डेपोतील गैरप्रकार कोणाच्या सांगण्यावरून लपवत आहेत, त्यांच्या डोक्यावर कोणाचा वरदहस्त आहे, हे पाहायला हवे. या घटनेबाबत पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णीदेखील मौन बाळगून आहेत,’ अशी टीका अंधारे यांनी केली.

Maharashtra TimesMoshi Accident: 83 तासांत मोशीतील रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 8 जणांचा करुण अंत; घटनास्थळी कुटुंबाचा हंबरडा
काहींचे हिंदुत्व ‘सिझनेबल’

‘काही लोकांचे हिंदुत्व ‘सिझनेबल’ असते. सध्या निवडणूक नसल्याने ते हिंदू-मुस्लिम, जात-धर्म करायला घटनास्थळी आले नाहीत,’ अशी टीका अंधारे यांनी आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता केली. ‘जात-धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांना काहीही वाटत नाही. इथे जात-धर्म करायचे असते, तर फडणवीसांची ‘बारकी गँग’ लगेच हजर झाली असती,’ असेही त्या म्हणाल्या.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा