Headlines

Suneel Darshan : अभिषेकसोबत मतभेद होते! करिश्मा कपूरबद्दल दिग्दर्शकाचा खुलासा; संजय कपूरबद्दल म्हणाले, ‘त्यांचं नातं अपूर्ण वाटत होतं’


Suneel Darshan : दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या मोडलेल्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. तसेच करिश्मा आणि संजय कपूर यांच्या नात्याबद्दलही सांगितलं आहे.

Suneel Darshan On Karisma Kapoor Relationship With Abhishek Bachchan And Sunjay Kapur
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन पाच वर्षे एकमेकांना डेट ककरत होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता आणि ते लग्नही करणार होते. मात्र, अचानक त्यांचं लग्न मोडलं, ज सर्वांना धक्का बसला. आता, दिग्दर्शक आणि निर्माता सुनील दर्शन यांनी त्यांच्या नात्याबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. त्याचबरोबर करिश्मा आणि संजय कपूर यांच्या नात्याबद्दलही भाष्य केलं आहे.

करिश्मा आणि अभिषेकमध्ये मतभेद होते

अलीकडेच, सुनील दर्शन यांनी ‘हिंदी रश’ला एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलं. सुनील दर्शन म्हणाले, ‘लोक बबिता, जया, करिश्मा किंवा अभिषेक यांना दोष देतात, पण माझा विश्वास आहे की या गोष्टी नशिबावर सोडून दिल्या पाहिजेत. त्यांचं नातं चढ-उतारांनी भरलेलं होतं. वेगवेगळी जोडपी आपलं प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात आणि प्रत्येक नात्याचं स्वतःचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. करिश्मा आणि अभिषेक यांच्यात मतभेद होते.

माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से

सुनील यांनी सांगितलं की, ब्रेकअपनंतर करिश्मा कपूर नवीन वर्ष साजरं करण्यासाठी न्यूयॉर्कला गेली होती. तेव्हा अचानक, ती उद्योगपती संजय कपूरशी लग्न करत असल्याची बातमी समोर आली. सुनील म्हणाले की, ‘अचानक मला कळलं की करिश्मा संजय कपूरशी लग्न करणार आहे. तिच्या त्या निर्णयामागचं कारण मला आजपर्यंत समजलेलं नाही. पण, आता या विषयावर जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण संजय कपूर आता या जगात नाहीत आणि त्यांना मुलंही आहेत, त्यामुळे या नात्याबद्दल बोलण्याचा अधिकार मला नाही, तो अधिकार फक्त करिश्मा कपूरलाच आहे.’
Maharashtra TimesKangana Ranaut : ‘कित्येक लोकांसाठी मोदी देव आहेत, त्यांच्या भावना दुखावू नका’; कंगनाचं आणखी एक विधान चर्चेत
”मेरे जीवन साथी’ सिनेमाच्या शूटिंगसाठी आम्ही एकदा कॅनडाला गेलो होतो, त्यावेळी संजयही आमच्याबरोबर होता. पण, त्यांच्या नात्यात काहीतरी कमी असल्याचं मला जाणवलं. प्रत्येक नातं पूर्णत्वाची जाणीव करून देत असतं, मात्र त्यांचं नातं कुठेतरी अपूर्ण वाटत होतं.’ असं सुनील यांनी शेवटी सांगितलं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा