Sukhada Khandkekar : सुखदा खांडकेकर नवरात्रीमध्ये देवीची मूर्तिपूजा नाही तर व्यक्तिपूजा करते. यामागचं कारण अभिनेत्रीनं ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी सुखदा खांडकेकर ही एक अभिनेत्री असून ती उत्तम नृत्यांगनासुद्धा आहे. सुखदाचा चाहतावर्गही मोठा आहे. अभिनेत्री गेल्या १४ वर्षांपासून नवरात्रीचा उपवास करतेय. नवरात्रीमध्ये सुखदा देवीची मूर्तिपूजा न करता व्यक्तिपूजा करते. यामागचं कारण अभिनेत्रीनं ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
१४ वर्षांपासून नवरात्रीचा उपवास
सुखदा खांडकेकर म्हणाली की, ‘आता १४ वर्ष झाली मी नवरात्रीचा उपवास करतेय. उपवास हा त्या गोष्टीचा करावा ज्या गोष्टीवर आपलं जास्त प्रेम आहे. म्हणजे, जी गोष्ट सोडली तर आपल्याला काहीतरी फरक पडेल. मी असंही काही जास्त खात नाही, त्यामुळे म्हटलं हा खोटा उपवास झाला. देवीसाठी आपल्या जवळची गोष्ट सोडली पाहिजे. डान्सर असल्यामुळे, ताईंनी शिकवल्याप्रमाणे आणि आई म्हणते, पाय स्वच्छ असावेत; त्यामुळे मी पावलांची खूप काळजी घेते. मी विचार केला, माझं सगळ्यात जास्त प्रेम पावलांवर आहे, त्यामुळे मी नवरात्रीचे नऊ दिवस चप्पल नाही घालत. हे मी अनेक वर्ष पाळतेय.’ Parineeta Borthakur : ‘माझ्यासोबत संबंध ठेवावे लागतील’, सिनेमाच्या नावाखाली दिग्दर्शकाची विचित्र मागणी, अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग
व्यक्तिपूजा करण्याचं कारण
सुखदा पुढे म्हणाली की, ‘नवरात्रीमध्ये खूप सुंदर अनुभव येतात. आम्ही दांडिया खेळायला जातो. मी नवरात्रीमध्ये कधीच मूर्तिपूजा करत नाही. कधीच कोणत्या मंदिरात जाऊन साडी, दागिने ह्यातलं काहीच चढवत नाही. व्यक्तिपूजेवर माझा जास्त विश्वास आहे. आमच्या घरात ज्या मावशी काम करतात, त्यांच्या पायावर मी स्वस्तिक काढून, त्यांना साडी आणि दागिना देते.’
‘आमचे स्नेही आहेत, त्यांनी दत्तक घेतलेला मुलगा अचानक गेला. त्याच्या पुढच्या वर्षीच त्यांना नवसाने मुलगी झाली. त्यावर्षी मी तिला पैंजण केले. एखादी स्त्री आजारी असेल, तिला मी भेटते. तिला त्यादरम्यान उपयोगी असलेल्या वस्तू देते. देवांनाही आपण त्यांच्या आवडीच्या गोष्टी देतो. तसंच मीसुद्धा एखाद्या स्त्रीला गरजेच्या वस्तू देते.’ असं सुखदानं शेवटी सांगितलं. Trupti Akkalwar : ‘कुणालाही पैसे काढायला द्यायचे नाहीत’, सिद्धूचा बँकेत फोन अन् बदललं अभिनेत्याच्या पत्नीचं आयुष्य; म्हणाली, ‘मी डिस्टर्ब झाले’ दरम्यान, सुखदा खांडकेकरच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा