Headlines

Stock Market Today: चौफेर खरेदीमुळे सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला, पण IBM क्रॅशचा इन्फोसिस-TCS सारख्या IT कंपन्यांना फटका; गुंतवणूकदारांचा हिरमोड! – share market today 15 july 2026 sensex surge over 500 pts ibm crash hit tcs infosys other it stocks


Share Market Today: भारतीय शेअर बाजारात कधी अप… तर कधी डाऊनचा कल सुरूच राहिला आहे. देशांतर्गत बाजारात बुधवार, 15 जुलै रोजी, तेजीची हिरवळ पसरली असताना IT स्टॉक्समध्ये घसरणीचा दबाव पाहायला मिळत आहे.

आदल्या दिवशी, मंगळवारी, IBM शेअर्समध्ये रात्रीतून झालेल्या मोठ्या विक्रीमुळे एंटरप्राइझ टेक्नॉलॉजीवरील खर्चाबाबत चिंता निर्माण झाली त्यानंतर, कमजोर जागतिक संकेतांचा मागोवा घेत बुधवारी सकाळच्या सत्रात भारतीय आयटी शेअर्समध्ये बहुतांशी घसरण झाली. देशांतर्गत बाजाराच्या सुरुवातीला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा आणि पर्सिस्टंट सिस्टम्स या शेअर्समध्ये घसरण झाली, तर एचसीएल टेक्नॉलॉजीज च्या शेअर्सनी या व्यापक प्रवाहाविरुद्ध कामगिरी केली.

Maharashtra TimesGold and Silver Prices Fall: गगनाला भिडलेल्या सोन्या-चांदीच्या दरांना ब्रेक; गोल्डपाठोपाठ सिल्वर झळाळीही फिकी! आज किती स्वस्त झाला दर

शेअर बाजारात आज काय घडलं

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 530.01 अंकांनी उसळला आणि 77,584.95 वर पोहोचला तर, एनएसई निफ्टी50 निर्देशांक 145.10 अंक वाढून 24,197.15 वर उसळला. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी अपेक्षेपेक्षा जास्त कमी झाली, ज्यामुळे फेड रिझर्व्हकडून पुढील व्याजदर वाढीबद्दल चिंता कमी झाली आणि जागतिक बाजारांमध्ये जोखीम घेण्याची प्रवृत्ती सुधारली, परिणामी देशांतर्गत बाजार तेजीच्या हिरव्या रंगात रंगला.

त्याचवेळी दुसरीकडे, गुंतवणूकदार अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सावध राहिले. या काळात दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आणि होर्मुझची सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चढाओढ सुरू राहिली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 96.1725 या पातळीवर उघडला, जो मागील सत्रात 96.20 वर बंद झाला होता.

Maharashtra TimesUS Tariff Threat: 500% शुल्क नको, पण 100% टॅरिफ तर द्यावाच लागेल! रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेची भारतावर कारवाई

शेअर बाजाराचे टॉप लूजर्स कोण

प्रमुख आयटी स्टॉक्सपैकी इन्फोसिसमध्ये सर्वाधिक घसरण झाली आणि 1.22% खाली आला. तसेच टीसीएस 0.43%, विप्रो 0.54% आणि टेक महिंद्रा 0.49% घसरले, तर पर्सिस्टंट सिस्टम्समध्ये 0.21% घट झाली.

सकाळी 9:35 वाजता देशांतर्गत निफ्टी आयटी निर्देशांक 0.67 टक्के घसरून 28,532.55 वर व्यवहार कर होता. या उलट एचसीएल टेक्नॉलॉजीज या एकमेव आयटी कंपनीच्या शेअर्सनी उंच उभारी घेतली. शेअर्स 0.76% वधारले. सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये LTIMindtree स्थिर व्यवहार करत राहिले.

IBM शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा

आदल्या दिवशी, मंगळवारी, अमेरिकन टेक कंपनी – IBM – शेअर्समध्ये 25 टक्क्यांची मोठी घसरण झाली, जी किमान 1968 पासून एका दिवसातील सर्वात मोठी घसरण असल्याचे म्हटले जात आहे. कंपनीचे तिमाही निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमजोर राहिले, त्यानंतर शेअर्समध्ये मोठी विक्री झाली ज्याचा परिणाम अमेरिकन बाजारात सूचीबद्ध भारतीय IT कंपन्यांच्या ADR वरही दिसून आला.

जुलैमधील Nifty IT निर्देशांकाची कामगिरी

जुलै महिन्यात आतापर्यंत निफ्टी आयटी निर्देशांक 9% वधारला आणि दुसरा सर्वोत्तम कामगिरी करणारा क्षेत्रीय निर्देशांक ठरला. आतापर्यंत टीसीएस आणि HCL टेकने जून तिमाहीचे निकाल जाहीर केले, त्यापैकी TCS चे निकाल अपेक्षांवर खरे उतरले तर, एचसीएलटेकचे निकाल अपेक्षेप्रमाणे वाईट नव्हते. तसेच एलटीएमच्या व्यवस्थापनाने देखील वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीतील वाढ आणि नफ्याच्या प्रमाणाबद्दल आशावाद व्यक्त केला.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत