Headlines

ST Bus Employee Salary Hike: कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी… – maharashtra govt approved da hra and annual salary increments for 86000 msrtc bus employees


ST Bus Employee Salary Hike: बसगाड्यांची संख्या २४ हजारांपर्यंत नेण्याची उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. एसटीच्या आगारांबाहेरच खासगी बेकायदा वाहतूकदार प्रवाशांना ‘टिपतात’! आगारांची स्थिती अत्यंत भयानक आहे.

sttt
st bus(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद घेऊन ‘गाव तेथे एसटी’ हे व्रत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने गेली अनेक वर्षे चालवले. मात्र अलीकडच्या काळात खासगी बससेवांची स्पर्धा, नव्या गाड्यांच्या खरेदीला बसलेली खीळ, नादुरुस्त गाड्या, वाढता इंधनखर्च, अनुदान-सवलतींचा बोजा आदींमुळे एसटीचे चाक तोट्याच्या गर्तेत रुतून बसले आहे. त्यापायीच या राज्यव्यापी वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्राप्तीवरही संक्रांत आली होती.

कर्मचाऱ्यांचे वेतन, ग्रॅच्युईटी, भत्ते व एकूणच थकीत देणी यांचे प्रमाण पाच हजार कोटींवर पोहोचले होते. अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्य सरकारने या ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के, घरभाडे भत्त्यात दोन ते सहा टक्के आणि वार्षिक वेतनवाढीत तीन टक्के वाढ मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे. एसटीच्या तिजोरीवर त्याचा भार पडणे स्वाभाविकच. त्यासाठीच एसटीचे व्यवस्थापन अधिक व्यावसायिक कसोटीवर चालविण्याची नितांत गरज आहे. बसआगारांचा व्यावसायिक वापर करण्याची सर्वंकष योजना महामंडळाने आखली, त्यातील तांत्रिक त्रुटी अजून दूर झालेल्या नाहीत. एसटीच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या १६ हजार असली, तरी सर्व बसगाड्या रस्त्यावर धावण्याच्या स्थितीतील नाहीत.

विजेवर चालणाऱ्या बस ताफ्यात दाखल होऊनही त्या वेळेत आगारातून सुटत नाहीत. जुन्या बसगाड्या रस्त्यावर कधी मान टाकतील, हे सांगता येत नाही. कित्येक गाड्या कमालीच्या अस्वच्छ असतात. आगारांमध्ये तंत्रकुशल कर्मचाऱ्यांची संख्या रोडावली असल्याने बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर त्याचा परिणाम होतो.

एसटीच्या कार्यशाळांमध्ये बांधल्या जाणाऱ्या बसगाड्या ही पूर्वी खासियत होती. खरेतर या कार्यशाळांचा अर्धव्यावसायिक वापर करून महसूलप्राप्तीचा नवा पर्याय उभा राहू शकतो. राज्य शासनाकडून मध्यंतरी निधीसाठी हात आखडता घेण्यात आला होता. एसटीकडे केवळ कमाईचे साधन म्हणून खचितच पाहता येणार नाही; परंतु ही सेवा व्यावसायिकरीत्या चालविली नाही, तर प्रवासीही टिकून राहणार नाहीत. मनुष्यबळाला सक्षम करतानाच आर्थिक शिस्तीची कसोटीही हवी.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा