स्कोडा ऑटो Volkswagen इंडियाने उत्पादनात एक नवीन टप्पा गाठला आहे. कंपनीच्या इंजिन उत्पादनाने 5 लाख युनिटचा टप्पा ओलांडला आहे.

मॉर्डन आणि पर्यावरणासाठी चांगले
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया (SAVWIPL) ने महाराष्ट्रातील पुणे येथील चाकणमध्ये कंपनीने इंजिन उत्पादनाने 5 लाख युनिटचा टप्पा ओलांडला आहे. या सक्सेसमुळे भारत फोक्सवॅगन ग्रुपसाठी एक महत्त्वाचे प्रोडक्शन सेंटर बनले आहे. येथे नवीन प्रकारची इंजिने बनवली जात आहेत जी पर्यावरणासाठी देखील चांगली आहेत. कंपनीच्या 1.0 लिटर टीएसआय इंजिनमध्ये अॅक्टिव्ह सिलिंडर टेक्नॉलजी तसेच 1.5 लिटर टीएसआय इंजिनमध्ये अॅक्टिव्ह सिलेंडर टेक्नॉलॉजी (एसीटी) आहे. यामुळे इंजिन अधिक इंधन एफिसिएंट होते आणि यामुळे प्रदूषण देखील कमी होते.
11 वर्षांपासून तयार करत आहे इंजिन
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 2014 पासून चाकण प्लांटमध्ये इंजिन बनवत आहे. हे इंजिने हाय-क्वालिटीचे आहेत ज्यामुळे प्रदुषण कमी प्रमाणात होते. SAVWIPL नवीन इंजिनांच्या निर्मितीमध्ये सतत गुंतवणूक करत आहे. फोक्सवॅगन ग्रुपला भारतात अधिक प्रोडक्शन तयार करायचे आहे.
गुंतवणुकीवर जास्त भर
एमटीएनएलचे बोर्ड सदस्य (उत्पादन आणि लॉजिस्टिक्स) अँड्रियास डिक म्हणाले की, पुण्यातील प्लांटमध्ये 5 लाख इंजिन प्रोडक्शन हे आपल्या ग्लोबल प्रोडक्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आम्ही टेक्नोलॉजी आणि वर्कफोर्स डेव्हलपमेंटवर सतत गुंतवणूक करत आहोत, ज्यामुळे आमच्या प्रोडक्शनची क्वालिटी आणि कॉस्ट-इफेक्टिवनेस सुधारली आहे. भारताची अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम आणि स्किल्ड वर्कफोर्स हाय-क्वॉलिटी पॉवरट्रेन सोल्यूशन वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
पियुष अरोरा काय म्हणाले?
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पियुष अरोरा म्हणाले, 2014 पासून, आम्ही कठोर मेहनत करत आहोत, आणि ही मेहनत आज कामी आली आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वर्ल्ड क्लास इंजिन विकसित केले आहेत. आमच्या मेड-इन-इंडिया इंजिनमध्ये हाय लेव्हलचे लोकलाइजेशन आहे, जे भारतीय ऑटोमोबाईल प्रोडक्शन आणि सप्लाई इकोसिस्टम सशक्त बनवत आहे.

