Six year old alia dies in mumbai mankhurd building collapse tragedy brother treated at wadia hospital; रोज कुशीत झोपणारी माझी लाडकी लेक कायमची गाढ झोपून गेली; मुंबईतील बापाने हंबरडा फोडला, दुर्घटनेत सर्वस्व गमावलं
Six year old alia dies in mumbai mankhurd building collapse tragedy brother treated at wadia hospital; रोज कुशीत झोपणारी माझी लाडकी लेक कायमची गाढ झोपून गेली; मुंबईतील बापाने हंबरडा फोडला, दुर्घटनेत सर्वस्व गमावलं
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: माझ्या अडीच वर्षांच्या मुलाच्या हाताला इंजेक्शन घेतल्यानंतर संसर्ग झाला होता. वाडिया रुग्णालयामध्ये त्याच्या हातावर शस्त्रक्रिया केली. आलियाला घरी काकांकडे ठेवून आम्ही दोघे रुग्णालयात होतो. रविवारी तिथेच टीव्हीवर शेजारचे घर कोसळल्याची बातमी पाहिली आणि पोटात खड्डा पडला. तसाच धावत मंडाळाला घरी पोहचलो… रोज कुशीत झोपणारी माझी लाडकी आलिया कायमची गाढ झोपून गेली… हे सांगताना अल्लाउद्दीन शेख यांच्या डोळ्यांतील पाऊस थांबत नव्हता. त्यांची सहा वर्षांची मुलगी आलिया मानखुर्द येथे घर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये ढिगाऱ्याखाली दबली गेली.
अल्लाउद्दीन काही वर्षांपासून नवी मुंबई येथे राहत होते. वर्षभरापूर्वी ते मंडाळा येथे कुटुंबासह राहायला आले. त्यांच्या गावचे अनेक नातेवाईक इथेच राहत असल्याने त्यांनी दोन मुलांसह येथे भाडेतत्त्वावर घर घेतले. मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना वाडिया रुग्णालयामध्ये जावे लागल्याने त्यांनी सहा वर्षांच्या आलियाला काकांकडे ठेवले. ती रोजच्याप्रमाणे संध्याकाळी समोरच्या घरी खेळण्यास गेली होती. येथे मोईनुद्दीन शाह यांची मुले तिच्या वयाची होती. पाऊस वाढत गेला आणि घर कोसळले. काळरात्रीने त्या घरातल्या अनमिया, कैसरजहां, सिराजुद्दीन, निहाल या लहान मुलांसोबत आलियावर घाला घातला.
निरोप कुठे द्यायचा… शवविच्छेदन केंद्राच्या बाहेर मुलांचे मृतदेह घेण्यासाठी मंडाळा परिसरामधून अनेक जण आले होते. चार मुले आणि त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यामुळे शेवटचा निरोप कुठे द्यायचा, यासाठी पोलिस आणि नातेवाइकांमध्ये चर्चा सुरू होती. मोईनुद्दीन शाह हे त्या दुर्घटनेत बचावले, मात्र पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाल्याचे कळताच ते सुन्न झाले.
‘वाडिया’ने केले आश्वस्त वाडिया रुग्णालयामध्ये आलियाच्या भावावर उपचार सुरू होते. त्याची आईही तिथे होती. मात्र आलियाच्या मृत्यूबद्दल कळताच तीदेखील सैरभैर झाली. वाडिया बालरुग्णालयाने या कुटुंबाला दिलासा देत काळजी करू नका, तुम्ही परत येईपर्यंत आम्ही मुलाची काळजी घेऊ, असे सांगून आश्वस्त केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा