Who is Siddharth Saxena: आयआयटी कानपूरपासून ते वेगाने वाढणाऱ्या AI स्टार्टअपच्या उभारणीपर्यंत सिद्धार्थ सक्सेनाचा प्रवास नाविन्य आणि विचारपूर्वक घेतलेल्या जोखमींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. Merlin या कंपनीचे सह-संस्थापक सिद्धार्थने एकाच दिवसात सुमारे 77 कोटी रुपये कमावले आणि वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी लक्षाधीश बनले.

एकाच दिवसात 77 कोटींची कमाई
सिद्धार्थ सक्सेनाच्या आयुष्याला एकाच दिवसात कलाटणी मिळाली. सिद्धार्थने असं काहीतरी साध्य केलं जे फार कमी लोकांना जमतं. आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी आणि Merlin चा सह-संस्थापक सिद्धार्थ सक्सेनाने एकाच दिवसात जवळपास 8- लाख अमेरिकी डॉलर्स किंवा सुमारे 77 कोटी रुपये कमावले आणि वयाच्या फक्त 26 व्या वर्षी करोडपती बनण्याचा मान मिळवला.
कोण आहेत सिद्धार्थ सक्सेना
टेक उद्योजक सिद्धार्थ सक्सेनाने कंटेंट क्रिएटर विराज अलासोबत एका स्ट्रीट मुलाखतीत आपण मोठं यश कसं मिळवलं याबद्दल सांगितले. संभाषणादरम्यान, सक्सेनाला त्यांच्या शिक्षणाबद्दल विचारण्यात आले असताना त्याने सांगितले की, भारतातील प्रतिष्ठित तांत्रिक संस्था आयआयटी कानपूरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेकची पदवी मिळवली आहे.
IIT कानपूरमध्ये एन्ट्री हार्वर्डपेक्षाही कठीण
एका रॅपिड-फायर मुलाखतीत सिद्धार्थने सांगितले की, आयआयटी कानपूरच्या बी.टेक सीएसई अभ्यासक्रमात प्रवेश मिळवणे हार्वर्डमध्ये एन्ट्री घेण्यापेक्षा 20 पट अधिक कठीण आहे. भारत सरकारच्या NIRF रँकिंगनुसार देशातील अव्वल अभियांत्रिकी संस्थांमध्ये आयआयटी कानपूरचा चौथा तर, एकूण श्रेणीमध्ये पाचवा क्रमांक लागतो. येथील बी.टेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केवळ JEE Advanced (खुली श्रेणी) मधील अव्वल 280 गुण मिळवणारे पात्र ठरतात.
एका वर्षात किती कमाई केली
एका वर्षात किती कमाई केली असं विचारलं असताना सिद्धार्थ म्हणाला, “मी हे आणखी चांगल्या प्रकारे सांगेन. मी एका दिवसात 80 लाख डॉलर्स (सुमारे 76 कोटी रुपये) कमावले.” म्हणजे सिद्धार्थ रातोरात करोडपती झाला का? असे मुलाखतकाराने विचारल्यावर सिद्धार्थ हसून म्हणाला, “हो, तसंच काहीसं.” तरुण उद्योजक वयाच्या 26 व्या वर्षी करोडपती बनला.
सिद्धार्थ सक्सेनाचा प्रवास
सिद्धार्थने 2019 मध्ये आयआयटी कानपुर येथून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षण घेताना व त्यानंतर अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम केले. 2017 मध्ये सिद्धार्थने एनव्हेस्टनेटमध्ये संशोधन आणि विकास इंटर्न म्हणून काम केले, तर 2019 मध्ये बेंगळुरूमधील योडली आणि मुंबईतील वाधवानी एआय येथे संशोधन इंटर्न म्हणून काम केले. मग 2018 मध्ये फिनलंडमधील आल्टो विद्यापीठात संशोधक त्यानंतर, Merlin सुरू करण्यापूर्वी, 2019 मध्ये कॅनडातील मॉन्ट्रियल येथील जुमिओ कॉर्पोरेशनमध्ये मशीन लर्निंग इंजिनिअर म्हणून काम केले.
…अन् मग सुरू केला स्वतःचा स्टार्टअप
2022 मध्ये सिद्धार्थने आयआयटी कानपुरमधील सहकारी प्रत्युष राय आणि सिरसेंदू सरकारसोबत Merlin नावाचा AI स्टार्टअप सुरू केला, जो एआय-आधारित क्रोम एक्सटेंशन आहे, ज्यामुळे लोकांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. मर्लिनने झपाट्याने यश मिळवले सध्या या स्टार्टअपचे मूल्य अंदाजे 50 दशलक्ष डॉलर्स असून सिद्धार्थ ‘थाइन’ नावाचे दुसरे एआय उपक्रमाचेही सह-संस्थापक आहेत.

