Headlines

Shoaib Akhtar : ‘माझं नाव काही महिलांसोबत जोडण्यात आलं’, पाकिस्तानी क्रिकेटपटूनं नाकारलेली बॉलिवूडची ऑफर, सांगितलं कारण


Shoaib Akhtar : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरला सलमान खानने सिनेमाची ऑफर दिलेली. मात्र, त्यानं ही ऑफर नाकारली. याबद्दल शोएबनं नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

shoaib akhtar on bollywood offer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या क्रिकेट कारकिर्दीसोबतच आपल्या बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखला जातो. नुकत्याच एका मुलाखतीत त्यानं आपल्या आयुष्यातील एका रंजक किस्सा सांगितला आहे. शोएबला एकदा बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. विशेष म्हणजे, अभिनेता सलमान खाननेही त्याला सिनेमाची ऑफर दिली होती. पण, शोएबने ही ऑफर नाकारली.

‘गँगस्टर’ सिनेमासाठी झालेली विचारणा

शोएब अख्तरने तामिश हाश्मी यांच्या शोमध्ये बोलताना सांगितलं की, त्याला ‘गँगस्टर’ या सिनेमासाठीही विचारण्यात आलं होतं. मात्र, इमरान हाश्मीनं साकारलेल्या मुख्य भूमिकेसाठी त्याला ऑफर देण्यात आली नव्हती. सिनेमातील एका वेगळ्या भूमिकेसाठी त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्या काळात भारत आणि पाकिस्तानतचे संबंध चांगले होते. त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम करण्याचा विचार शोएबनं केला होता. मात्र, क्रिकेट आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांना समान वेळ देणं त्याच्यासाठी कठीण होतं.

Maharashtra TimesChinmayee Sumeet : ‘मराठी डाऊनमार्केट भाषा, असं जिममध्ये सांगितलेलं’, चिन्मयी सुमीत यांनी सांगितला अनुभव, मराठी भाषा सक्तीवर काय म्हणाल्या?

सलमान खाननेही दिली होती ऑफर

शोएबने सांगितले की, सलमान खाननेदेखील त्याला सिनेमाची ऑफर दिली होती. मात्र, क्रिकेट आणि फिल्म इंडस्ट्री यांच्यात आपला वेळ विभागण्याची इच्छा नसल्यानं त्यानं ही ऑफर नाकारली. क्रिकेटपटू म्हणून त्याच्यावर आधीच मोठी जबाबदारी होती. त्यात सिनेमाच्या शूटिंगसाठी अनेक महिने द्यावे लागले असते. त्यामुळे दोन्ही करिअर एकाच वेळी सांभाळणं त्याला योग्य वाटलं नाही. याबद्दल बोलताना शोएब म्हणाल की, ‘सलमान खानने मला एका सिनेमाची ऑफर दिली होती, पण मी ती नाकारली. कारण, मला माझा वेळ दोन प्रोफेशनमध्ये विभागायचा नव्हता. प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना सिने-इंडस्ट्रीला वेळ देता येत नव्हता. जर सिनेमामध्ये काम केलं असतं तरी माझं नाव कोणत्यातरी अभिनेत्रीबरोबर जोडलं गेलं असतं.’

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

‘मला दोन वेगवेगळ्या जगात राहायचं नव्हतं. मी सहा-सात महिने क्रिकेट खेळायचो आणि मग सहा-सात महिने शूटिंग करत होतो. पण, त्यातही माझं नाव काही महिलांबरोबर जोडण्यात आलं होतं. याबद्दल मी विचारसुद्धा केला. पण, मी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकत नाही, हे मला जाणवलं. एकीकडे माझा फिटनेस माझ्यासाठी महत्त्वाचा होता, तर दुसरीकडे माझ्यावर सिनेमा हिट झालाच पाहिजे असा दबाव होता, त्यामुळे मी नकार दिला.’ असं शोएब म्हणाला.

Maharashtra TimesHimani Shivpuri : ‘माझ्या पतीचं निधन झालंय अन् तो पोलीस अधिकारी माझ्या भुमिकेबद्दल बोलत होता’, लोकप्रिय अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग
शोएब अख्तरनं याच मुलाखतीत सलमान खानचं भरभरून कौतुक केलं. शारीरिकदृष्ट्या तो आणि सलमान खान सारखे दिसतात. मात्र, सलमान त्याच्यापेक्षा खूप चांगला माणूस आहे. ‘सलमानसमोर मी काहीच नाही. तो खूप चांगल्या स्वभावाचा आहे. तो लोकांना मदत करत असतो.’ असं शोएब म्हणाला. तसेच शोएबनं सलमानचा बायोपिक आला तर त्यात सलमानची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा