Shivsena omraje nimbalkar makes a major announcement about union cabinet expansion; ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला; ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रिपदाबद्दल केली मोठी घोषणा
Shivsena omraje nimbalkar makes a major announcement about union cabinet expansion; ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला; ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रिपदाबद्दल केली मोठी घोषणा
Shivsena News: केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच बदल होणार असून महाराष्ट्रातील ओमराजे निंबाळकर यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांनी आता याबाबत खुलासा केला आहे.
ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला; ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रिपदाबद्दल केली मोठी घोषणा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धाराशिव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून लोकसभेच्या सहा खासदारांनी बंड केल्यानंतर बंडखोरांविरोधात रान पेटवण्यासाठी उद्धव ठाकरे हे सदर खासदारांच्या लोकसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांनी काल परभणी आणि धाराशिव या मतदारसंघात जात तेथील खासदारांवर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बंडाबाबत आपली भूमिका मांडली असून सत्तेसमोर शहाणपण चालत नसल्याने आता आम्ही शहाणपण बाजूला ठेवून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. यावेळी ओमराजे यांनी मंत्रिपदाबाबतही महत्त्वाची घोषणा केली आहे.
ओमराजे निंबाळकर हे ठाकरे कुटुंबाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. शिवसेनेत २०२२ साली पहिलं बंड झाल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले आणि ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदार-खासदारांवर ओमराजे यांनी जोरदार निशाणा साधला होता. तसंच निष्ठेपेक्षा काहीही मोठं नसल्याचं ते सांगत होते. मात्र आता ओमराजे यांनीच बंडाचं निशाणा फडकावल्याने त्यांच्यावर राज्यभरातील ठाकरे समर्थकांकडून टीका होत आहे. पैशासाठी आणि मंत्रिपदासाठी ओमराजेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र मी मंत्रिपद स्वीकारणार नसल्याचं ओमराजे यांनी काल जाहीर केलं आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्रिपदाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “मला अनेकजण म्हणत आहेत की तुम्ही स्वार्थासाठी आणि मंत्रिपदासाठी पक्ष बदलला आहे. पण मी आज जाहीर करू इच्छितो की, मी मंत्रिपद स्वीकारणार नाही. समोरून मला ऑफर आली तरी मी ती नाकारेन. कारण मी माझ्या मंत्रिपदासाठी हा निर्णय घेतलेला नाही. माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांसाठी मी हा निर्णय घेतला असून कामाच्या माध्यमातून मी टीका करणाऱ्यांना उत्तर देईन,” असं मत ओमराजे यांनी व्यक्त केलं आहे.
लवकरच मंत्रिमंडळ फेररचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची लवकरच फेररचना होणार असल्याची चर्चा आहे. यावेळी महाराष्ट्रातील काही विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होणार असून काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांच्यासह ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यातील ओमराजे निंबाळकर यांनी स्वत:च आपण मंत्रिपद स्वीकारणार नसल्याचं जाहीर केल्याने आता शिवसेनेकडून कोणाला संधी दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा