Share Market News: शेअर बाजारात गुंतवणूक करणारी प्रत्येक व्यक्ती मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असते, जेणेकरून रातोरात त्यांचं आयुष्य उजळेल. बाजारातील गुंतवणूकदार अशा छुप्या स्टॉकच्या शोधात असतात जेणेकरून कमीत कमी वेळेत त्यांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. बाजारातील असंख्य मल्टीबॅगर स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी पैसा छापायची मशीन बनले आहेत ज्यांनी केवळ गुंतवणूक दुप्पटच केली नाही तर, त्यांना श्रीमंतांच्या पंक्तीत जाऊन बसवले.
प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील स्मॉल-कॅप मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केवळ दोन दिवसांत 40% परतावा दिला आणि 2026 पर्यंत या स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करून 5 वर्षांत एक लाख रुपयांचे 9 लाख रुपये केले. शिवालिक बायमेटल कंट्रोल्स असं या स्टॉकचे नाव आहे, जो गेल्या काही सत्रांपासून सतत अप्पर सर्किट हिट करत असून चर्चेत आला.
सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी (10 ऑगस्ट), या मल्टीबॅगर स्टॉकने 20% अप्पर सर्किट हिट केले आणि 1,105.05 रुपयांवर क्लोज झाला तर, मंगळवारी बाजाराच्या घसरणीत या स्टॉकने नांगी टाकली दुपारी 12.30 वाजता 6.68 टक्के घसरणीसह 1,031.25 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. त्याचवेळी, याआधी शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रातही 20% जोरदार वाढ नोंदवली गेली होती. म्हणजे केवळ दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये जवळपास 40% उल्लेखनीय वाढ झाली असून सध्या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5.94 हजार कोटींवर पोहोचले आहे.
1984 मध्ये सुरू झालेली शिवालिक बायमेटल कंट्रोल्स ही प्रिसिजन इंजिनिअरिंग आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील प्रख्यात कंपनी आहे, जी प्रामुख्याने करंट सेन्सिंग कंपोनंट्स, स्विचिंग सोल्यूशन्स, प्रिसिजन मटेरियल्स आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक असेंब्लीजचे उत्पादन करते. या कंपनीने बनवलेल्या उत्पादनांचा वापर ऑटोमोटिव्ह, ऊर्जा साठवण, इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये केला जातो. तसेच, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रांमधील वाढत्या मागणीमुळे कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे.
Adani US Case: अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; Criminal Case रद्द, लाचखोरी-फसवणुकीचे आरोप मागे; तरी लागेल 18 दशलक्ष डॉलर्सचा दंडकंपनीच्या फंडामेंटल्समध्ये झालेली लक्षणीय सुधारणा गेल्या पाच वर्षांतील दमदार कामगिरीमागील मुख्य चालक ठरली. शिवालिक बायमेटल कंट्रोल्सने महसूल तिप्पटीहून अधिक आणि नफा जवळपास चौपट केला असून मार्जिन्समध्येही वाढ केली. याशिवाय कंपनीच्या व्यवसायाचा कल आता अधिक वाढीची क्षमता असलेल्या क्षेत्रांकडे वळला आहे ज्यामध्ये शंट रेझिस्टर्स आणि इलेक्ट्रिक वाहने, स्मार्ट मीटर्स व ऊर्जा साठवणूक प्रणालींशी संबंधित ॲप्लिकेशन्सचा समावेश आहे.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा