Headlines

Shekhar Phadke : ‘काही चॅनलवर मला काम मिळत नाही, 10-12 वर्षांपूर्वी न सांगता मालिकेतून काढण्यात आलेलं’, मराठी अभिनेत्याचं वक्तव्य


Shekhar Phadke : मराठी अभिनेते शेखर फडके यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मालिकांमधील कामाबद्दल भाष्य केलं आहे.

Shekhar Phadke On Loss Of Projects
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेते शेखर फडके यांनी आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. शेखर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत काम करत आहेत. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी कामाबद्दल भाष्य केला आहे. स्पष्टवक्तेपणामुळे माझी खूप कामं गेली, असं शेखर यांनी म्हटलंय.

मुलाखतीदरम्यान शेखर फडके यांना मनासारखं काम मिळालं नाही, असं वाटतं का? असं विचारलं असता शेखर म्हणाले की, ‘याचं कारण मी स्वतः आहे. करोनाच्या अगोदर माझ्यात स्पष्टवक्तेपणा होता. समजा तुम्ही नाटकाचे किंवा मालिकेचे निर्माते असाल आणि मला ती मालिका आवडली नाही, तर मी सांगायचो की, फार वाईट नाटक आहे किंवा वाईट मालिका आहे. त्यामुळे तो माणूस पुढे त्याच्या एखाद्या कामामध्ये मला का घेईल? त्याच्या दृष्टीने तो बरोबर आहे.’

Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स

यापूर्वी कधी असं झालंय का? असं विचारलं असता शरद म्हणाले की, ‘खूपदा झालंय, आताही होतं. माझे मित्र निर्माते, दिग्दर्शक आहेत. ते पण मला सांगतात, तू आमच्याशी तेव्हा तसं वागला होतास. चॅनेलमध्ये काही माणसं अशी आहेत की, जी कॉलेजमध्ये स्पर्धांना एकत्र होती. तिथे मी त्यांना मात दिली. पुरस्कारांच्या संदर्भात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला नाही, मला मिळाला. पुढे ते टेक्निकल टीमकडे वळले, मी अभिनयाकडे वळलो. त्याचा राग त्यांच्या मनात अजूनही आहे. म्हणून, काही चॅनेलला मला काम मिळत नाही. मला काही मालिकांमधून काढलेलं आहे आणि कारण न देता काढलेलं आहे. त्यामध्ये प्रोडक्शनचं काही चुकलेलं नाही, ही दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.’

Maharashtra TimesMugdha Shah : सावत्र आईकडून छळ, मैत्रीण ठरली देवदूत, मृत्यूच्या दाढेतून परतली मराठी अभिनेत्री; सांगितला कठीण काळ

‘मला मालिकांमधून काढत होते’

‘यामध्ये मी राकेश सारंगचं नाव घेऊ शकतो. ‘साहेब बीबी मी’ ही मालिका आलेली. त्याच वाहिनीवर एका कार्यक्रमाचं मी अँकरिंग करत होतो. काही कारणास्तव मी तो शो सोडला. ते कारण मी त्यांना सांगू शकत नव्हतो कारण ते वैयक्तिक होतं. त्यांना असं वाटलं की, चॅनेलनं न काढता याने शो सोडला. त्यानंतर मला असं कळालं की, त्या कारणामुळे मला सगळ्या मालिकांमधून काढत होते. पण, राकेश सारंग यांनी विरोध केला. तेव्हापासून मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे. ही माझी माणसं आहेत, हे मी बोलवलेले कलाकार आहेत, मग हे मोठे कलाकार असू देत किंवा नवीन कलाकार असू देत. याला काढणार असाल तर संपूर्ण मालिका बंद करतो, असं राकेश यांनी सांगितलेलं. हे मी इतरांकडून ऐकलंय. मी त्यांच्या तोंडून ऐकलं नाही. पण, राकेश यांचा त्यांच्या प्रोडक्शनवर आणि कलाकारांवर खूप विश्वास आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकतो.’ असं शेखर यांनी सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत शेखर फडके बोलत होते.

Maharashtra TimesAnangsha Biswas : ‘एका रात्रीचे किती पैसे घ्याल?’, ‘मिर्झापूर’मधील भूमिकेमुळे बदलली अभिनेत्रीची प्रतिमा; सांगितला वाईट अनुभव
‘काही ठिकाणी पैशांचं बोलावं लागतं, कारण तो मागितल्याशिवाय मिळत नाही. हे मला करोनानंतर कळलं. माझ्या स्पष्टवक्तेपणामुळे माझी खूप कामं गेली आहेत.’ असंही शेखर यांनी सांगितलं.