Shalmali Kholgade : शाल्मली खोलगडेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुप्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडेनं वयाच्या ३१व्या वर्षी मुस्लीम मुलासोबत लग्न केलं. मुस्लीम मुलासोबत लग्न केल्यामुळे शाल्मलीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शाल्मलीनं तिच्या लग्नावर आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल सांगितलं आहे.
शाल्मली म्हणाली की, ‘मी मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडले आणि आम्ही लग्न केलं. माझ्या पालकांनी आमच्या रिलेशनशिपला कधीच विरोध केला नाही. मुलगा कसा आहे? एवढाच त्यांचा प्रश्न होता. त्यांनी मला २ प्रश्न विचारले. एक म्हणजे, तुझं त्याच्यावर आणि त्याचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे का? दुसरा प्रश्न म्हणजे, तुला मुलं हवी आहेत का? आणि त्याला मुलं हवी आहेत का? मी म्हणाले, ‘नाही.’ या प्रश्नावर तुमच्या दोघांचं एकमत असलं पाहिजे. तसंच हा प्रश्न तुम्ही थोड्या थोड्या कालावधीने एकमेकांना विचारता राहायला हवा, जेणेकरुन एखाद्याचं उत्तर कळेल.’ Raj Thackeray : ‘तुम्ही मोदींचं कौतुक करताय, भारतावर एवढं प्रेम आहे तर दुबईत का राहता?’ राज ठाकरेंचा विवेक ओबेरॉय आणि आर. माधवनला टोला
‘त्याचबरोबर ‘तुमच्यातले शारिरीक संबंध कसे आहेत?’ असा प्रश्न माझ्या आईने मला विचारला होता. मी शॉक झाले. कारण आमच्यात याआधी असं बोलणं कधीच झालं नव्हतं. मी म्हणाले, ‘आई, काहीही काय विचारते. सगळं ओके आहे’. ती मला म्हणाली, ‘हा सगळा विचार करून ठेव. लग्न यशस्वी होण्यासाठी हे महत्वाचं आहे.’
नवऱ्याबद्दल बोलताना शाल्मली म्हणाली की, ‘मी आणि फरहान लग्नाआधी ६ वर्ष एकमेकांसोबत होतो, त्यामुळे आम्ही एकमेकांना ओळखून होतो. त्यात लॉकडाऊनमध्ये तर आम्ही एक वर्ष एकत्र होतो. त्यामुळे एकमेकांशी संपूर्ण दिवस न बोलण्यापासून ते एकमेकांचा सहवास आवडण्यापर्यंत आम्ही सगळं पाहिलं. मी त्याच्या कुटुंबियांनाही ओळखते.’
Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद
‘मी हिंदू असले तरी त्याची आई आणि बहीण तर कधीच आमच्या विरोधात नव्हत्या. त्यामुळे आमच्या दोघांच्या पालकांना आमच्यात नात्यात काहीही अडचण नव्हती आणि हेच आम्हालाही हवं होतं. प्रॉब्लेम फक्त समाजाला होतो. त्यांनी या लग्नाला ‘लव जिहाद’ वगैरे म्हटलं. पण जेव्हाही माझ्या आईला लोक माझ्या नवऱ्याबद्दल विचारतात, तेव्हा माझी आई त्यांचं वाक्य संपायच्या आतच माझा जावई किती छान आहे असं म्हणत त्याचं गुणगान गाते. यामुळे सगळं किती छान आहे हेच लोकांना कळतं.’ असं शाल्मलीनं शेवटी सांगितलं. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाल्मली बोलत होती.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा