हॉटेल-रेस्टोरंट बिलांमध्ये सेवा शुल्क
बेकायदेशीर असले तरी आजही रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बिलामध्ये गुपचूप सेवा शुल्क ॲड करतात, ज्याची बऱ्याच लोकांना कल्पना नसते. माहीत असूनही रेस्टॉरंट मालकांनी बिलातून सेवा शुल्क काढून टाकण्यास सांगितले, तर तसे करण्यास नकार देतात. वेटरला मिळणारी टीप किंवा स्वतःच्या धोरणांचे कारण देऊन ही बेकायदेशीर वसुली करतात. याआधी केंद्र सरकारने रेस्टॉरंटना कोणाकडूनही सेवा शुल्क न आकारण्याचे निर्देश दिले पण, तरीही ग्राहकांच्या रोजच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर CCPA ने सेवा शुल्क आकारण्यावरून 41 रेस्टॉरंटवर दंड आकारला आहे.
Gold Silver Price Today: आठवड्याभराच्या घसरणीनंतर सोने-चांदीचा दर वाढला, काय आहे आजचा रेट? युद्धाच्या सावटात खरेदीचा पॅटर्नच बदलला
लक्षात घ्या की तुम्ही एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तुमच्याकडून जबरदस्तीने सेवा शुल्क आकारले गेले तर, तुम्ही सहन करू नका. अशा मनमानी रेस्टॉरंट मालकांनी तुमच्याकडून आकारलेला पै पै परत केला पाहिजे, जे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने प्रणाली स्थापित केली आहे. मात्र, सर्वसामान्यांमधील माहितीच्या अभावामुळे बहुतेक ग्राहक रेस्टॉरंट आणि हॉटेल्सच्या या मनमानी पद्धतीची तक्रार करत नाहीत.
सेवा शुल्काचा नियम काय
सर्वप्रथम लक्षात घ्या की कोणताही ग्राहक आपल्या मर्जीने सेवा शुल्क देऊ शकतो, पण बंधनकारक नाही. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यानुसार कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटने बिलामध्ये मनमानी सेवा शुल्क जोडणे बेकायदेशीर असते. जेवण किंवा सेवा चांगली असेल तर, ग्राहक आनंदाने सेवा शुल्क भरू शकतो, त्यांच्यावर बंधनकारकपणे लादले जाऊ शकत नाही.
Crude Oil Price Hike Shock: धोक्याची घंटा! तेलाच्या किमती पेटल्या; पेट्रोलपासून किराणा वस्तूपर्यंत सगळं महागणार? जगाची तेलकोंडी होण्याची चिंता वाढली
रेस्टॉरंट सेवा शुल्क आकारत असल्यास कुठे तक्रार करायची?
ग्राहकांना माहिती असले पाहिजे की एखाद्या रेस्टॉरंटने जेवणाच्या बिलामध्ये सेवा शुल्क जोडले आणि तुम्ही विनंती करूनही सेवा शुल्क हटण्यास नकार देत असेल, तुम्ही सरकारकडे तक्रार करू शकता. हॉटेल-रेस्टॉरंटने सेवा शुल्क आकारण्याविरुद्ध तक्रार करण्याचे अनेक मार्ग आहेत.
Property Rights: पतीने आईच्या नावावर केलेली मालमत्ता खरंच घटस्फोटित पत्नीला मिळत नाही? परिस्थितीत हिस्सा मिळू शकतो समजून घ्या
1915 वर कॉल करा : एखाद्या रेस्टॉरंटने सेवा शुल्क माफ करण्यास नकार दिला तर, तुम्ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक 1915 वर कॉल करू शकता.
NCH ॲप: तुमच्या मोबाईलवर NCH ॲप (राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन) डाउनलोड करून रेस्टॉरंटविरुद्ध तक्रार दाखल करू शकता. येथे दाखल केलेल्या तक्रारींवर त्वरित प्रक्रिया केली जाते.
ई-दाखिल पोर्टल: ई-दाखिल पोर्टलवर – edaakhil.nic.in – देखील तक्रार करू शकता, ज्यामुळे वकिलाच्या सहभागाशिवाय घरबसल्या ग्राहक आयोगाकडे ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.
CCPA ई-मेल करा: तुमचे बिल आणि तक्रार CCPA ला com-ccpa@nic.in या ई-मेल ॲड्रेसवर पाठवू शकता. रेस्टॉरंट किंवा हॉटेलद्वारे होणाऱ्या या बेकायदेशीर वसुलीबद्दल तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करू शकता.

