Headlines

Section 87A Income Tax Rebate; तुम्ही आगाऊ टॅक्स तर भरत नाहीत ना? ITR मध्ये मिळू शकते 60000 पर्यंतची कर सवलत, नक्की काय करावं लागेल समजून घ्या


Tax Rebate: तुम्ही आयकर विवरणपत्र दाखल करणार असाल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. यावर्षी, ITR भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे त्यामुळे, करदात्यांनी आपल्या टॅक्सचे आगाऊ नियोजन करणे आणि सर्व नियमांविषयी माहिती ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

करदात्यांना कलम 87A चा फायदा

आयकर विवरणपत्र म्हणजे ITR दाखल करण्याची डेडलाईन जसजशी जवळ येत आहे तसतसं करदात्यांमध्ये संभ्रम वाढत आहे.काही जण जुन्या करप्रणालीनुसार ITR भरण्याची गरज आहे की नाही याबाबत संभ्रमात सापडले आहेत तर, काही जण नवीन करप्रणालीतील फायदे जाणून घेत आहेत. पण तुम्हाला माहित्येय का की तुम्ही नवीन किंवा जुनी करप्रणाली निवडली तरी, आयकर कायद्यात अशी तरतूद आहे जी जी दोन्ही करप्रणालींअंतर्गत हजारो रुपयांची कर बचत करण्यास मदत करू शकते.
Maharashtra TimesITR भरण्याची तयारी, पण आधी 1 लाख रुपये वाचवणारे Section 80D समजून घेणे अत्यावश्यक, तुमचा मोठा कर वाचेल
यासाठी तुम्ही आयटीआर दाखल करताना इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 87A चा लाभ घेऊ शकता. सरकारने नवीन करप्रणालीसाठी हे कलम अद्ययावत केले आहे, पण दोन्ही करप्रणालींअंतर्गत सवलती सारख्याच आहेत.

कलम 87A काय आहे?

प्राप्तिकर कायद्यातील कलम 87A काय आहे? त्याअंतर्गत किती कर सवलत मिळते? आयकर कायद्याच्या या कलमांतर्गत करदात्यांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उत्पन्नावर पूर्णपणे कर सूटचा दावा करता येतो. कलम 87अ जुन्या करप्रणालीमध्ये उपलब्ध आहे, तर आता नवीन करप्रणालीमध्ये अपडेट करून 115BAC(1A) केले गेले असून ही दोन्ही कलमे केवळ विशिष्ट उत्पन्नापर्यंत कर सवलत देतात.
Maharashtra TimesForm 16 विनाही भरता येईल ITR फॉर्म! जाणून घ्या सोप्या स्टेप्स

जुन्या करप्रणालीत किती सूट मिळते?

आयकर कायद्यातील कलम 87A नुसार करदात्याच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कर सूटचा फायदा मिळतो. म्हणजे सरकार तुमच्या वार्षिक उत्पन्नाचे कॅल्क्युलेशन करते पण, वसूल करत नाही आणि संपूर्ण रक्कम करमुक्त असते. जुन्या नियमांनुसार 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर 12,500 रुपये कर लागतो, जो कलम 87Aअंतर्गत पूर्णपणे माफ केला गेला आहे. मात्र, उत्पन्न 5 लाख रुपयांवर पोहोचले तर, करदात्यांना ही रक्कम जोडून संपूर्ण उत्पन्नावर कर आकारला जातो आणि या सवलतीचा लाभ मिळत नाही.

नवीन करप्रणालीनुसार किती सूट?

तुम्ही नव्या करप्रणालीतून आयकर विवरणपत्र दाखल करत असाल तर तुम्हाला कलम 87A ऐवजी कलम 115BAC(1A) अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळेल. या कलमांतर्गत करदात्यांना 60,000 रुपयांची कर सवलत किंवा रिबेट मिळू शकते.

सरकारने नवीन कर प्रणालीअंतर्गत 12 लाख रुपयेपर्यंत वार्षिक उत्पन्नावर पूर्णपणे कर सवलत दिली असून अंदाजे 60,000 रुपयांच्या उत्पन्नावर कर आकारला जातो, पण संपूर्ण रक्कम माफ केली जाते. मात्र लक्षात घ्या की तुमचे वार्षिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण रकमेवर कर आकारला जाईल आणि तुम्हाला या कलमांतर्गत कोणतीही सूट मिळणार नाही.
Maharashtra Times‘या’ ट्रिकने दरवर्षी वाचवा 15,000 पेक्षा जास्त टॅक्स, तज्ज्ञांनी सांगितला सोपा फॉर्म्युला

कलम 87A चा फायदा कोणाला?

फक्त वैयक्तिक करदात्यांना आयकर कायद्यातील या कलमाचा फायदा मिळतो. म्हणजे कंपन्या, हिंदू अविभक्त कुटुंबे किंवा HUFs आणि अनिवासी भारतीय या सूटचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे, तुम्ही शेअर्स विकून दीर्घकालीन किंवा अल्पकालीन भांडवली नफा कमावला असेल, तरीही या सूटचा फायदा मिळू शकणार नाही. याशिवाय लॉटरी, गेम शो किंवा विशेष कर दर आकारल्या जाणाऱ्या इतर उत्पन्नावरही हा लाभ उपलब्ध नाही.

ITR मध्ये रिबेटचा दावा कसा करायचा

सर्वप्रथम तुमचे संपूर्ण वार्षिक उत्पन्न कॅल्क्युलेट करा. त्यानंतर, करपात्र उत्पन्न मोजण्यासाठी कोणतीही सूट आणि वजावट काढून टाका. तुमचे करपात्र उत्पन्न तुमच्या ITR मध्ये नमूद करा आणि तुमचे उत्पन्न विहित मर्यादेत असेल, तर कलम 87A अंतर्गत सवलतीचा दावा दाखल करा. आयकर विभागाने आयटीआर-2 आणि आयटीआर-3 मध्ये देखील ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मार्जिनल रिलीफ म्हणजे काय?
नव्या करप्रणालीत तुमचे वार्षिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त आहे आणि देय कर 12 लाख रुपयांवरील अतिरिक्त उत्पन्नापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही मार्जिनल रिलिफसाठी पात्र ठरता. उदाहरणार्थ तुमचे करपात्र उत्पन्न 12.15 लाख रुपये आहे, म्हणजे 12 लाखांच्या लिमिटपेक्षा 15 रुपयांनी जास्त असेल, तर सामान्य परिस्थितीत, यावर 62,650 रुपये कर लागतो.

मात्र, मार्जिनल रिलिफचा दावा केल्यानंतर 15000 रुपयांपर्यंत कमी होईल. 4% आरोग्य आणि एज्युकेशन सेंस जोडल्यानंतर तुमची कर देयता 62,650 रुपयांवरून 15,600 रुपयांपर्यंत कमी होईल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत