काय आहे ही नोटीस?
तुम्हाला चालू निर्धारण वर्षासाठी परतावा मिळणे बाकी असल्याचे आयकर विभागाला आढळून येते, पण मागील आर्थिक वर्षाची कर थकबाकी देखील आहे, तेव्हा कलम 245 अंतर्गत नोटीस जारी केली जाते. म्हणजे तुम्ही मागील वर्षांमध्ये कर भरला नसेल किंवा एखादी मागणी प्रलंबित असेल, तर या वर्षी मिळालेला परतावा थेट त्यामध्ये समायोजित केला जाईल.
Gold ETFs Inflows: भारतीयांनी Gold Crash चा पुरेपूर घेतला फायदा; 3,443 कोटींची खरेदी केली; जागतिक प्रवासाच्या विरुद्ध गेम फिरवला
उधारणार्थ 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 12000 रुपयांचा परतावा मिळणे अपेक्षित असेल पण, 2022-23 या आर्थिक वर्षातील टॅक्स क्रेडिट्समधील तफावत किंवा कर चुकवल्यामुळे तुमचा 8000 कर थकीत आहे. अशा परिस्थितीत, आयकर विभाग कलम 245 अंतर्गत तुमच्या परताव्यामधून ही थकीत रक्कम वजा करण्याचा प्रस्ताव देतो. परिणामी, तुम्हाला 12000 रुपयांऐवजी केवळ 4000 रुपयांचा निव्वळ परतावा मिळेल.
तुमचा आयकर परतावा रोखला किंवा कापला का जातो?
आयकर विभागाकडून तुमचा परतावा रोखून धरण्याची किंवा कपात करण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- जुनी कर थकबाकी शिल्लक असणे
- चुकीचे आयटीआर दाखल करणे किंवा त्यातील तफावत
- टीडीएस/कर क्रेडिटमधील तफावत
- असेसमेंटनंतर उद्भवणारी नवीन मागणी
अशा प्रकरणांमध्ये, आयकर विभाग प्रथम नोटीस पाठवतो आणि नंतर स्थापित कार्यपद्धतीनुसार परतावा समायोजित करतो.
PF Interest Credit: 10 लाख, 50 लाख असो वा 1 कोटी, तुमच्या EPF खात्यात व्याजाचे किती रुपये येतील? जाणून घ्या संपूर्ण गणित
आयकर विभागाची नोटीस मिळाल्यावर काय करायचं?
कलम 245 च्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला महागात पडू शकते. करदात्यांना साधारणपणे 30 दिवसांच्या आत प्रतिसाद देणे आवश्यक असते. असे करण्यासाठी आयकर पोर्टलला भेट द्या आणि
- Response to Outstanding Demand हा विभाग उघडा.
- मागणी स्वीकारा किंवा नाकारा
तुम्हीच आयकर विभागाच्या डिमांडशी सहमत असाल, तर तुमच्या परताव्याची रक्कम त्यानुसार समायोजित केली जाईल. तुम्ही असहमत असाल तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसह प्रतिसाद देणे बंधनकारक आहे.
आयकर परतावा शून्य कधी होतो?
बऱ्याच प्रकरणांमध्ये करदात्यांना पूर्ण परतावा मिळण्याची अपेक्षा असते, पण कलम 245 समायोजित केल्यानंतर खात्यात एक रुपयाही जमा होत नाही. देय कर जास्त असेल, तर पूर्ण परतावा कापला जाऊ शकतो, पण तुम्हाला उर्वरित रक्कम स्वतंत्रपणे भरावी लागू शकते.
कलम 245 अंतर्गत नोटीस मिळाली तर, भीती वाटणे साहजिक आहे पण एका ठरलेल्या प्रक्रियेचा भाग आहे. वेळेवर प्रतिसाद देऊन आणि तुमची कर नोंदी अद्ययावत ठेवून, तुम्ही तुमचा आयटीआर परतावा सुरक्षित करू शकता.

