SBI Funds Management IPO Details: आदल्या दिवशी, बुधवारच्या मोठ्या घसरणीतून सावरत भारतीय शेअर बाजारावर 9 जुलै रोजी सुधारणेचा रंग चढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून देश-विदेशातील बाजारात अस्थिरता पसरलेली, ज्यामुळे अनेक कंपन्यांनी आपला आयपीओ लाँच पुढे ढकलला. आता बाजार हळूहळू सावरू लागला असताना आयपीओंची रांग लागली असताना पुढील आठवड्यात SBI फंडचा आयपीओ लाँच होणार आहे.

शेअर बाजारात येणार नवीन आयपीओ
देशांतर्गत बाजारात आयपीओंचा वेग कायम राहिला असून देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी SBI म्युच्युअल फंडाचे गुंतवणूक व्यवस्थापक, एसबीआय फंड्स मॅनेजमेंटचा आयपीओ पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला होईल.
Gold Silver Rate 9 July 2026: सराफा बाजाराला युद्धाचा आघात; सोन्या-चांदीच्या किमतीवर तणावाचा परिणाम, आज किती बदलले दर?
कंपनीने आपला RHP दाखल केला असून हा आयपीओ पूर्णपणे OFS म्हणजे ऑफर फॉर सेल असेल. 14 जुलै रोजी सब्स्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि 16 जुलै रोजी बंद होईल, तर अँकर गुंतवणूकदार 13 जुलैपर्यंत बोली लावू शकतील. या इश्यूमुळे सामान्य गुंतवणूकदारांना SBI फंड्स मॅनेजमेंटच्या व्यवसायात पहिल्यांदाच हिस्सा मिळवण्याची संधी मिळेल.
एसबीआय फंड्स मॅनेजमेंटचा IPO पूर्णपणे असेल, म्हणजे कंपनी कोणतेही नवीन शेअर्स जारी करणार नाही आणि केवळ विद्यमान शेअरधारक आपला हिस्सा विकतील. या आयपीओअंतर्गत एकूण 203.7 कोटी इक्विटी शेअर्स विकले जातील, जे कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या अंदाजे 10.0013% आहे. या आयपीओनंतर ही कंपनी HDFC एएमसी आणि ICICI प्रुडेन्शियल एएमसी सारख्या मोठ्या कंपन्यांमधील स्पर्धा वाढेल, असा बाजार तज्ज्ञांचा अंदाज आहे.
Loan Recovery: कुटुंबप्रमुखाने घेतलेलं कर्ज पत्नी-मुलाला फेडावं लागतं? मृत व्यक्तीच्या कर्जाची जबाबदारी कोणाची? वसुलीवर कोर्टाचा स्पष्ट निकाल
आयपीओचा किंमत बँड आणि एकूण गुंतवणूक
त्याचप्रमाणे, SBI फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडने या इश्यूसाठी 545-574 रुपये किंमत बँडही निश्चित केला आहे. त्यानंतर, 18 जुलै रोजी अलॉटमेंट निश्चित केले जाईल आणि वाटप न झाल्यास परतावा व अलॉट केलेले शेअर्स 20 जुलै रोजी डिमॅट अकाउंटमध्ये जमा होतील. मग मंगळवार, 21 जुलै रोजी, कंपनीचे शेअर्स देशांतर्गत बाजारात सूचीबद्ध होतील. अशाप्रक्रारे, अप्पर किंमत बँडनुसार एसबीआय फंड्स मॅनेजमेंटचे लिस्टिंगनंतर बाजार भांडवल सुमारे 1.17 लाख कोटींपर्यंत वाढेल.

