Satara DCC Bank निवडणुकीवरून राडा, शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंचे कार्यकर्ते भिडले – satara district bank election clash breaks out between two factions
Satara DCC Bank निवडणुकीवरून राडा, शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंचे कार्यकर्ते भिडले – satara district bank election clash breaks out between two factions
#satara #dccbankelection #shivendrarajebhosle #shashikantshindeसातारा जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवेळी उठलेला राजकीय धुरळा खाली बसतो न बसतो, तोच साताऱ्याच्या राजकारणात आणखी एका मोठ्या राजकीय संग्रामाची ठिणगी पडली आहे. नाबार्डचे सलग सातपेक्षा जास्त राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे! पण ही निवडणूक फक्त एका सहकारी बँकेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर या निवडणुकीने साताऱ्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अत्यंत तीव्र संघर्षाचे रूप धारण केले आहे. विकास सोसायट्यांच्या ठरावांवरून संघर्ष निर्माण झालाय आणि पोलिसांचा आणि ‘एसआरपीएफ’च्या जवानांचा पहारा ठेवावा लागत आहे! साताऱ्यातील जावळी तालुक्यातील ‘आखाडे’ गावात नक्की काय घडलं? अवघ्या एका ठरावासाठी लाखोंचा चुराडा कसा झाला? विरोधक आणि सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांवर नेमके काय आरोप होत आहेत? आणि या निवडणुकीच्या निमित्ताने साताऱ्याचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे? या संपूर्ण घडामोडीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊय़ा…