Headlines

Sanjay Raut On Devendra Fadnavis | आपण प्रखर रामभक्त…’ राऊतांचं फडणवीसांना रामरक्षा आंदोलनाचं आमंत्रण


मुंबई – राज्यातील राजकाराणात कधी काय होईल याचा अंदाज लावता येत नाही… रोज मुख्यमंत्र्यांना टीकास्त्र डागणारे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण धाडले आहे.. यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे…

काय आहे प्रकरण..?

राज्याच्या राजकारणात सध्या राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

संजय राऊत सध्या नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. येत्या 18 जुलै रोजी, शनिवारी नागपुरात रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. राम मंदिरातील कथित देणगी चोरी आणि गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात येणार असून, याच पार्श्वभूमीवर राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

पत्रात काय लिहलंये…

या पत्राची सुरुवात देवेंद्र फडणवीसजी, जय महाराष्ट्र! अशी सुरूवात करत खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहेत. “आपण एक प्रखर रामभक्त आणि कढाट हिंदुत्ववादी आहात. अयोध्येतील राम जन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याचे आपण नेहमी सांगता, आपल्यासारख्या लाखो राम भक्तांच्या संघर्षातून राम जन्मभूमी मुक्त झाली व अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले. याच राम मंदिरात चोरी, लुटमार, फसवणूक असे गुन्हे घडत आहेत व शेकडो कोटींचा अपहार झाला. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अयोध्येतील चोरीबाबत ‘शोक’ व्यक्त केला. शिवसेना उद्या बाळासाहेब ठाकरे पक्षाने या राम मंदिर लुटीबाबत लोकांत जागूती आणण्यासाठी ‘रामरक्षा उपक्रम सुरू केला. रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा हे समजून घ्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. सदर कार्यक्रम नारपुरात होत असल्याने आपण या ‘रामरक्षा’ उपक्रमात आवर्जुन सहभागी होऊन राम भक्तांना शुभेच्छा द्याव्यात, ही आग्रहाची विनंती.” असे पत्र राऊतांनी त्यांना पाठवले आहे.

दरम्यान, राम मंदिरातील कथित गैरव्यवहारावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राम मंदिराचा कारभार नीट चालवता येत नसेल, तर मंदिराच्या चाव्या हिंदुत्ववादी संघटनांच्या हाती द्याव्यात, अशी मागणी राऊतांनी केली आहे. तसेच, राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

त्यामुळे आता संजय राऊतांनी दिलेल्या या निमंत्रणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात, आणि ते रामरक्षा आंदोलनात सहभागी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत