संजय राऊत भडकले
भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले, मुंबईत दोन मृत्यू झाले, पण मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम निर्लज्जपणे काल एक झाडात एक माणूस मेला, एक महिन्यापूर्वी गेला असं हसून निलजुपणे दात काढून व्यंग काढून हसताय, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच या पक्षाचा अंतरआत्मा किती क्रूर आणि विकृत आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या थोडी जरी संवेदनशीलता शिल्लक असेल तर अशा माणसाला ताबडतोब हाकलून दिले पाहिजे…
विधानभवन परिसरात साटम यांचा हास्यविनोद
मॅनहोलमधील मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर लगेचच २ जुलै रोजी विधानभवनाच्या आवारात केलेल्या या व्हिडिओमध्ये, साटम टिप्पणी करताना हसताना दिसत आहेत. या संवादादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) ज्येष्ठ नेते जयंत पाटील हेदेखील हसताना दिसतात.
