Headlines

Sanjay Ghadi reacts on proposal of Innova Crysta Car to Mumbai Deputy Mayor; आधी मुंबईत सरकारी बंगल्याची मागणी; आता नव्या कोऱ्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडीच्या प्रस्तावावर उपमहापौर संजय घाडींचं उत्तर


Mumbai News : दहिसरहून मुंबई महापालिका मुख्यालयाला दररोज ये-जा करताना प्रवासात बराच वेळ जातो, त्यामुळे राणीची बाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांचा रिकामा बंगला आपल्याला देण्याचा आग्रह उपमहापौरांनी धरला होता. त्यानंतर ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडी देण्याचा प्रस्ताव येताच संजय घाडी यांनी काय भूमिका घेतली पाहा

Sanjay Ghadi Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेतील उपमहापौरांसह सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्या, तीन वैधानिक समिती अध्यक्षांसाठी नव्या कोऱ्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाड्या घेण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव लवकरच मुंबई महापालिका आयुक्तांकडे जाणार आहे. मात्र ‘सध्या सेवेतील गाडी सुस्थितीत आहे, कोणतीही तक्रार नाही,’ असे स्पष्ट करत उपमहापौर संजय घाडी यांनी नवीन इनोव्हा गाडी घेण्यास नकार दिला.

दहिसर पूर्व येथून मुंबई महापालिका मुख्यालय येथे दररोज ये-जा करताना प्रवासात बराच वेळ जातो आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते, असे सांगत राणीची बाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांचा रिकामा बंगला आपल्याला देण्याचा आग्रह उपमहापौरांनी काही काळापूर्वी धरला होता. त्यावरुन विरोधीपक्षासह सर्वसामान्य नागरिकांनीही टिकेची झोड उठवली होती. त्यानंतर ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडी नाकारत घाडींनी आस्ते कदम धोरण अवलंबल्याचे दिसते.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

‘आरोग्याचा त्रास असलेल्यांनी गाडी घ्यावी,’ असे शिवसेनेने, तर ‘सध्याची गाडी सुस्थितीत आहे, पाच वर्षांचे कंत्राट रद्द करण्याचा प्रश्न आहे,’ असे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या आणि शिवसेना उबाठाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट करत सावध भूमिका घेतली. नव्या कोऱ्या गाड्या घेण्यावरून मनसे, काँग्रेसने टीका केली आहे.
Maharashtra TimesCrime News : मेकॅनिक प्रियकराने बँक कर्मचारी प्रेयसीचा जीव घेतला, किचनमध्ये बॉडी टाकून अपघात भासवला, एका क्लूने पुरता अडकला

‘इनोव्हा क्रिस्टा’ कारची मागणी

उपमहापौरांसह सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, तीन वैधानिक समिती अध्यक्ष, सहा विशेष समिती अध्यक्षांसाठी ‘स्कॉर्पिओ एन’ हे ई-वाहन दिले आहे. ‘ही वाहने प्रवासासाठी सोयीची नाहीत,’ असे सांगत महापालिका सभागृह नेते गणेश खणकर यांनी स्वत:साठी, तसेच उपमहापौर, तीन वैधानिक समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेत्यांसाठीही ‘इनोव्हा क्रिस्टा’ कारची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली.

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीत कर्ज आणि यादीचा घोळ, ‘हेअरकट’ प्रकरण काय?

संजय घाडी काय म्हणाले?

यासंदर्भात ‘सत्ताधारी-विरोधकांच्या दिमतीला महागड्या कार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच, राजकीय स्तरावर टीका होऊ लागली. काही राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली. यामध्ये उपमहापौर संजय घाडी यांनी मात्र, ‘मला स्कॉर्पिओ गाडीच बरी,’ असे स्पष्ट केले.

‘वॉर्डचे सहा सहायक आयुक्त यांच्यासाठी स्कॉर्पिओ गाड्या घेण्याचा जुना प्रस्ताव होता. त्यात काही बदल केले. मात्र स्थायी, सुधार, शिक्षण समित्यांच्या अध्यक्षांना आताच्या गाड्या बदलून हव्या असून मोठी वाहने हवी आहेत. मला कोणतीही नवीन महागडी इनोव्हा नको, स्कॉर्पिओ कारच बरी,’ असे घाडी यांनी स्पष्ट केले.
Maharashtra TimesUddhav Thackeray : शिवरायांनाही अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटलेले, युवकांना झुरळ म्हणणारे आणि त्यांच्यात काय फरक? ठाकरेंचा घणाघात
‘आरोग्याच्या दृष्टीने कुणाला त्रास होत असेल, त्यांनी नवी गाडी घ्यावी, अन्यथा महापालिकेची बचत केलेली बरी,’ असे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी सांगून सावध पवित्रा घेतला. ‘महापालिकेने स्कॉर्पिओ कार घेताना संबंधित कंत्राटदारासोबत पाच वर्षांचा करार केला आहे, त्याचे पैसे भरले आहेत आणि हा करार कसा मोडणार असा प्रश्न आहे,’ असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. ‘स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन मोठ्या कंपन्यांची यामुळे स्पर्धा झाली आहे आणि हा त्यामागील कोणाचा अजेंडा असू शकतो याचा विचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.